अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशातील घुसखोर आणि बेकादेशीर राहणाऱ्या इतर देशांच्या नागरिकांना पुन्हा त्या त्या देशांत पाठवून देण्याचा सपाटा लावला आहे. आता ट्रम्प यांनी ही समस्या कायमची सोडवण्यासाठी जगभरातील ४१ देशांतील नागरिकांना कायमची प्रवेश बंदी केली आहे.
(हेही वाचा विधानपरिषद निवडणुकीसाठी BJP मध्ये हालचालींना वेग; मराठवाड्यातील ‘या’ दोन नावांपैकी एकाला संधी?)
या यादीत ७ मुसलमान देश आहेत. प्रवास प्रतिबंध करण्यासाठी अमेरिकेने (America) जगभरातील देशांचे रेड, ऑरेंज आणि यलो अशा प्रकारे वर्गीकरण केले आहे. यात भारताच्या जवळच्या पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि भूतान या देशांचाही यात समावेश आहे. अमेरिकेचा (America) व्हिसा आंशिक निलंबित करण्याच्या यादीत काही देशांना टाकण्यात येणार आहे. यात पाकिस्तानचाही समावेश आहे. असे २६ देश आहेत. या यादीत तुर्कमेनिस्तान, बेलारूस, भूतान आणि वानुआतु यांचा देखील समावेश आहे. रेड लिस्टमध्ये अफगाणिस्तान, क्युबा, इराण, लिबिया, उत्तर कोरिया, सोमालिया, सुदान, सीरिया, व्हेनेझुएला आणि येमेन हे देश आहेत. या देशाच्या नागरिकांना दिलेले व्हिसा रद्द केले जाणार आहेत. तसेच यापुढे या देशाच्या नागरिकांना अमेरिकेत (America) प्रवेश असणार नाही.
Join Our WhatsApp Community