America चा रशिया आणि चीनमधील काही संस्थांवर प्रतिबंध

106
अमेरिकेचे (America) राष्‍ट्राध्‍यक्ष जो बायडेन यांच्‍या सरकारने युक्रेनवर रशियाने केलेल्‍या आक्रमणांना पाठिंबा देणार्‍या रशिया आणि चीनमधील ४०० हून अधिक व्‍यक्‍ती आणि संस्‍था यांवर प्रतिबंध घातला आहे. निर्बंधांच्‍या या यादीत रशियाचे संरक्षणमंत्री आंद्रे बेलोसोव्‍ह यांचा मुलगा पावेल बेलोसोव्‍ह यांच्‍यासह इतर ३४ रशियन व्‍यक्‍तींची नावे आहेत. रशिया आणि चीन यांच्‍यासह अमेरिकेने बेलारूस, इटली, तुर्कीये, ऑस्‍ट्रिया, लिक्‍टेंस्‍टाईन आणि स्‍वित्‍झर्लंड या देशांच्‍या नागरिकांवरही निर्बंध लादले आहेत.
अमेरिकेच्‍या (America) या यादीत या देशांतील १२३ संस्‍थांचा समावेश आहे. यांमध्‍ये रशिया किंवा युक्रेनच्‍या क्रिमिया क्षेत्रातील ६३ संस्‍था, हाँगकाँगसह चीनमधील ४२ संस्‍था आणि तुर्कीये, इराण आणि सायप्रस यांमधील १४ संस्‍थांचा समावेश आहे. ‘युक्रेनच्‍या स्‍वातंत्र्याचे रक्षण करत असतांना अमेरिका युक्रेनला पाठिंबा देत राहील’, असे अमेरिकेच्‍या कोषागार विभागाने म्‍हटले आहे. युक्रेनचे राष्‍ट्राध्‍यक्ष व्‍लोदिमिर झेलेंस्‍की यांनी हा निर्णय घेणार्‍या अमेरिकेचे आभार मानले. अमेरिकेने हा निर्णय घेऊन रशियाच्‍या ऊर्जा आणि इंधन क्षेत्रांना लक्ष्य केले आहे, असे त्‍यांनी म्‍हटले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.