तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा या सध्या देशभर चर्चील्या जात आहेत. कारण संसदेत पैसे घेऊन प्रश्न विचारल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी हा आरोप केला असून याची लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आचार समिती गठीत केली होती. त्याच समिती समोर गुरुवारी (२६ ऑक्टोबर) सुनावणी पार पडली. (‘Cash-For-Query’ Row)
खासदार महुआ मोईत्रा यांना लोकसभेच्या आचार समितीने संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याप्रकरणी (कॅश फॉर क्वेरी) ३१ ऑक्टोबर रोजी बोलावले आहे. आचार समितीचे प्रमुख विनोद के सोनकर यांनी ही माहिती दिली. खासदार निशिकांत दुबे यांच्या तक्रारीची सुनावणी करणाऱ्या आचार समितीचे अध्यक्ष भाजप खासदार विनोदकुमार सोनकर आहेत. व्ही. डी. शर्मा, सुमेधानंद सरस्वती, अपराजिता सारंगी, डॉ. राजदीप रॉय, सुनीता दुग्गल आणि सुभाष भामरे हे समितीचे सदस्य आहेत. (‘Cash-For-Query’ Row)
(हेही वाचा – JK Encounter : कुपवाडामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; २ दहशतवादी ठार)
आज लोकसभेच्या आचार समितीची सुनावणी झाली. आचार समितीच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी महुआंचे वकील जय अनंत देहादराय उपस्थित होते, हे महत्वाचं. जय अनंत यांच्यानंतर भाजप खासदार निशिकांत दुबेही समितीसमोर हजर झाले. उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्या सांगण्यावरून तृणमूल काँग्रेस खासदाराने संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप दुबे यांनीच केला होता. (‘Cash-For-Query’ Row)
चौकशी केल्यानंतर निशिकांत यांनी सांगितले की, जेव्हाही त्यांना बोलावले जाईल तेव्हा ते समितीसमोर हजर होतील. निशिकांत म्हणाले- माझ्याकडून जो काही पुरावा मागितला जाईल, तो मी देईन, संपूर्ण सत्य कागदपत्रांमध्ये आहे. काँग्रेसकडून या समितीत व्ही वैथिलिंगम, एन उत्तम कुमार रेड्डी, बालासोर वल्लभनेनी आणि प्रणीत कुमार यांचा समावेश आहे. याशिवाय शिवसेनेचे हेमंत गोडसे, जेडीयूचे गिरीधारी यादव, सीपीआय (एम)चे पीआर नटराजन आणि बसपचे दानिश अली यांचा समावेश आहे. (‘Cash-For-Query’ Row)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community