- प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. आता दोन दिवसांनी सत्ता स्थापनेसाठी शपथविधी होणार आहे. मात्र अद्याप मुख्यमंत्री कोण होणार आणि कोणाला कोणते मंत्रीपद मिळणार हे स्पष्ट झालेलं नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे म्हटले जात आहे आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गृहमंत्री पदावर ठाम आहेत. ते आजारी देखील आहेत त्यामुळे त्यांनी सोमवारी आपल्या सगळ्या बैठका रद्द केल्या होत्या. मंगळवारी रूटीन तपासण्या करण्यासाठी ठाण्यातील ज्यूपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार हे सोमवारी दिल्लीला गेले होते. अमित शाह (Amit Shah) यांच्या भेटीला गेले होते. मात्र त्यांची भेट झालेली नाही.
(हेही वाचा – Packaged Drinking Water : बाटलीबंद पाणी अशुद्ध; FSSAI चा धक्कादायक अहवाल)
अजित पवारांचा आधीच पाठिंबा, भाजपा पक्षश्रेष्ठी नाराज?
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि अवघ्या काही तासांमध्ये अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पाठिंबा दिला. मात्र पाठिंबा देण्याची त्यांची कथित स्मार्ट खेळी अजित पवारांसाठी अडचण ठरत असल्याची माहिती पुढे आली आहे. कारण अजित पवार हे सोमवारी अमित शाह (Amit Shah) यांना भेटायला गेले होते. मात्र अमित शाह हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत फौजदारी कायद्यासंदर्भातील कार्यक्रमाकरिता चंदीगढला निघून गेले. त्यामुळे अजित पवार यांना दिलीत प्रतीक्षेत बसावे लागले आहे. आता अजित पवार यांना प्रतीक्षेत बसावे लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला तत्परतेने दिलेल्या पाठिंब्यामुळे महायुतीचे वरिष्ठ नेते नाराज आहेत का, अशी कुजबुज सुरु आहे. त्यामुळे आता अजित पवार यांना अमित शाह (Amit Shah) यांच्या भेटीसाठी दिल्लीत ताटकळत बसण्याची वेळ आल्याचे सांगितले जाते.
(हेही वाचा – भारताला जगात सर्वोच्च स्थानावर पोहोचवण्यात ‘सनातन आश्रमा’चे मोठे योगदान; Swami Govinddev Giri यांचे प्रतिपादन)
राज्यात एकनाथ शिंदे यांच्याकडून सुरू असणाऱ्या दबाव धोरणामुळे आपल्या खात्यांना कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी अजित पवारांनी सोमवारी अचानक दिल्ली गाठल्याची चर्चा होत आहे. अजित पवार यांच्यासोबत त्यांचा मुलगा पार्थ पवार, खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलही दिल्लीत अमित शाह (Amit Shah) यांना भेटायला गेले होते. अमित शाह यांची भेट घेण्याच्या उद्देशाने या सर्वांची एक बैठक झाली होती. मात्र, अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी चंदीगढला निघून गेल्यामुळे अजित पवार यांना दिल्लीतील मुक्काम वाढवावा लागला.
(हेही वाचा – Devendra Fadnavis यांच्याकडून चहावाल्याला शपथविधीचं निमंत्रण)
भेट न झाल्याने पवारांची सारवासारव
या सगळ्याविषयी अजित पवार यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून आम्ही दिल्लीत फिरायला आल्याचे सांगण्यात आले. सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या खासदार आहेत. त्यामुळे आम्ही दिल्लीत आल्याची सारवासारव अजितदादांकडून करण्यात आली. आता मंगळवारी अमित शाह (Amit Shah) आणि अजित पवार यांची भेट होणार का ? आणि जर भेट झाली तर काय चर्चा होणार हे बघणं महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community