मला राहुल गांधींना (Rahul Gandhi) काही प्रश्न विचारायचे आहेत. तुम्हाला तिहेरी तलाक (Triple Talaq) परत आणायचा आहे का? तुम्हाला मुस्लिम पर्सनल लॉ (Muslim Personal Law) परत आणायचा आहे का? तुम्ही भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे समर्थन करता की नाही? तुम्ही श्रीराम मंदिरात (Ram mandir Ayodhya) दर्शनाला का गेला नाही ? रायबरेलीतील नागरिक कलम 370 हटवण्याच्या निर्णयाल समर्थन देतात की नाही?” असे थेट प्रश्न अमित शाह यांनी राहुल गांधींना विचारले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी रविवारी (12 मे) रोजी उत्तर प्रदेशातील काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या रायबरेली मतदारसंघात जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधीना 5 प्रश्न विचारले.
(हेही वाचा – टीमसीच्या नेत्यामध्ये हिंदूंविरोधात बोलण्याची हिंमत येते कुठून? PM Narendra Modi यांचा हल्लाबोल )
काँग्रेसचा विकासावर विश्वास नाही
“रायबरेलीच्या लोकांनी गांधी-नेहरुंना संधी दिल, वर्षानुवर्षे एकाच कुटुंबाचे इथे राज्य होते. निवडून आल्यानंतर सोनिया गांधी आणि त्यांचे कुटुंब किती वेळा रायबरेलीला आले? रायबरेलीत 3 डझनहून अधिक मोठे अपघात झाले, गांधी कुटुंब आले होते का? ते तुमच्या सुख-दु:खातही सामील होत नाहीत. तुम्ही अनेक वर्षे गांधी घराण्याला संधी दिली, विकासाची कामे झाली नाहीत. अमेठीनेही आम्हाला संधी दिली, आम्ही अमेठीचा विकास केला. काँग्रेसचा विकासावर विश्वास नाही. भाजपला संधी द्या, आम्ही रायबरेलीचा वेगाने विकास करू,” असे आवाहन केंद्रीय गृहमंत्र्यांनी या वेळी केले.
खासदार निधीतून काही मिळाले का ?
अमित शाह पुढे म्हणाले की, “राहुल गांधी आज इथे मते मागण्यासाठी आले आहेत. तुम्ही इतकी वर्षे त्यांना मतदान करत आहात, तुम्हाला खासदार निधीतून काही मिळाले का ? त्यांनी पूर्ण निधी खर्च केला, तुम्हाला मिळाला नाही, तर गेला कुठे? खासदारांचा 70 टक्के पेक्षा जास्त पैसा अल्पसंख्यांकांवर खर्च करण्याचे काम सोनिया गांधींनी केले. अनेकांनी मला सांगितले की, ही एका कुटुंबाची जागा आहे. प्रियंका गांधी म्हणाल्या होत्या की, मी माझ्या कुटुंबाकडे मते मागण्यासाठी आले आहे.” अशा शब्दांत अमित शाह (Amit Shah) यांनी गांधी घराण्यावर निशाणा साधला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community