
Amit Shah : महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी किल्ले रायगडाला ३४५ व्या पुण्यतिथी अभिवादन सोहळ्या निमित्त किल्ले रायगडावर (Amit Shah visits Raigad Fort) भेट दिली. यावेळी भाषणात ‘स्वतःला ‘आलमगीर’ म्हणवणाऱ्या औरंगजेबाचा पराभव महाराष्ट्रात झाला आणि त्याची कबर देखील इथेच आहे’, असेही अमित शाह म्हणाले. अमित शाहांकडून छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले. रायगडावरील पुण्यतिथी कार्यक्रमाला अमित शाह यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. (Amit Shah)
(हेही वाचा – UPI Down : यूपीआय पुन्हा डाऊन! एका महिन्यात दुसऱ्यांदा वापरकर्त्यांना नाहक त्रास)
जनतेला संबोधित करताना केंद्रिय मंत्री अमित शाह म्हणाले की, जिजाऊंनी फक्त शिवरायांना जन्म दिला नाही, तर बाल शिवाजीला स्वराज्याचा विचार दिला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक घडवण्याचे महान कार्य त्यांनी केले,” असे अमित शाह यावेळी म्हणाले. रायगडावरील सुवर्ण सिंहासनाच्या ठिकाणी शिवरायांना अभिवादन करताना आपल्या मनातील भावना शब्दांत मांडणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले. “स्वराज्य आणि स्वधर्मासाठी शिवरायांनी संपूर्ण आयुष्य वेचले. आदिलशाही आणि निजामशाहीने वेढलेल्या महाराष्ट्राला हिंदवी स्वराज्यात (Hindvi Swarajya) रूपांतरित करण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले,” असेही शाह म्हणाले.
शिवाजी महाराजांच्या जन्मकाळात महाराष्ट्र अंधारात बुडाला होता, स्वधर्म आणि स्वराज्याबद्दल बोलणे गुन्हा मानले जात होते, असे सांगत शाह यांनी शिवरायांच्या साहसाची थोरवी अधोरेखित केली. “शिवरायांनी भगवा झेंडा फडकवण्याची आणि स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. मी अनेक नायकांची चरित्रे वाचली, पण शिवरायांसारखे साहस आणि पराक्रम एकाही नायकात दिसले नाही,” असे शाह म्हणाले.
(हेही वाचा – IPL 2025, KKR vs CSK : ऋतुराज गायकवाड कोलकाता विरुद्ध का खेळला नाही?)
शिवाजी महाराजांनंतरच्या (Shivaji Maharaj) काळात औरंगजेबाच्या आक्रमणांना मराठ्यांनी कसे तोंड दिले, याचा उल्लेख करताना शाह म्हणाले, “छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी, संताजी आणि धनाजी यांनी औरंगजेबाविरुद्ध अथक लढा दिला. त्यामुळेच त्याची कबर याच मातीत बांधली गेली.” मराठ्यांच्या या पराक्रमामुळे स्वराज्याचा गौरव कायम राहिला, असे त्यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांची आज ३४५ वी पुण्यतिथी (Chhatrapati Shivaji Maharaj’s 345th death anniversary) त्यानिमित्ताने रायगडावरती अभिवादन सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, छत्रपती उदयनराजे भोसले यांसारख्या दिग्गजांच्या उपस्थितीने या प्रसंगाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. शिंदेशाही पगडी आणि कवड्यांच्या माळेने अमित शाह यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना अमित शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना फक्त महाराष्ट्रापुरतेच मर्यादीत ठेवू नका, असेही म्हटले.
हेही पहा –