देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आज (१४ एप्रिल) विदर्भ दौऱ्यावर असून ते भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ साकोली (Sakoli) येथे प्रचारसभा घेणार आहेत. विशेष म्हणजे शनिवारी (१३ एप्रिल) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी साकोली (Sakoli) येथे जाहीर सभा घेतली होती. या सभेतून त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यामुळे गांधींच्या या टीकेला अमित शहा (Amit Shah) कसा पलटवार करणार याकडे सर्वांचे लक्ष असेल. (Amit Shah)
(हेही वाचा –Arun Gawli : ‘डॅडी’ जाणार कुणीकडे?)
दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदर्भात जंगी सभा घेतली होती. आता अमित शहा (Amit Shah) देखील विदर्भात सभा घेणार आहेत. त्यांच्या सभेसाठी भाजपने जोरदार कंबर कसली आहे. (Amit Shah)
काय म्हणाले होते राहुल गांधी ?
या सभेतून त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं होतं. गेल्या १० वर्षांत केंद्र सरकारने फक्त धनाढ्यांसाठीच काम केलं असून हे जनतेचे नव्हे, तर अदानींचे सरकार आहेत. अशी टीका राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केली होती. देशात तब्बल ३० लाख सरकारी पदे रिक्त असून, मोदी सरकारने गेल्या १० वर्षांत ही पदे भरली नाही. आज देशात बेरोजगारी ही सर्वांत मोठी समस्या आहे. पंतप्रधान मोदी सर्व विषयांवर बोलतात पण बेरोजगारीवर बोलत नाहीत. आमची सत्ता येताच ३० लाख जागा भरण्यात येतील, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. त्याचबरोबर आम्ही सत्तेत आल्यानंतर लष्कर भरतीची अग्निवीर योजना रद्द करू आणि शेतकऱ्यांनाही कर्जमाफी देऊ, असे आश्वासन राहुल गांधी यांनी मतदारांना दिले होते.
हे पहा –
Join Our WhatsApp Community