जळगावच्या सभेत Amit Shah यांचा मविआवर हल्लाबोल; म्हणाले, आरक्षण…

125
जळगावच्या सभेत Amit Shah यांचा मविआवर हल्लाबोल; म्हणाले, आरक्षण…
जळगावच्या सभेत Amit Shah यांचा मविआवर हल्लाबोल; म्हणाले, आरक्षण…

राज्यात विधानसभा निवडणुकीला (Maharashtra Assembly 2024) काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. दरम्यान, प्रचार सभांचा जोर शिगेला पोहोचला आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) ११ नोव्हेंबर रोजी जळगाव रावेर येथील जनतेला संबोधित केले. यावेळी आरक्षणाच्या मुद्द्यावरून (Reservation issue) मविआवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात मुस्लिमांना 10% आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. आरक्षणाची मर्यादा ही 50 टक्क्यांपेक्षा जास्त होऊ शकत नाही. त्यामुळे ओबीसी आणि दलितांचे आरक्षण कमी करून ते मुस्लिमांना देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. (Amit Shah)

जळगाव येथील सभेत अमित शाह म्हणाले की, जोपर्यंत संसदेत भाजपाचा खासदार आहे तोपर्यंत मुस्लिमांना आरक्षण मिळू देणार नाही, असंही अमित शाह यावेळी म्हणाले.या सभेला भाजपा नेते गिरीश महाजन (Girish Mahajan), केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यासोबत जळगाव जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार उपस्थित होते. फैजपूर येथील जे. टी. महाजन इंग्लिश मीडियम स्कूलच्या मैदानावर ही सभा पार पडली. 

(हेही वाचा – Canada तील हिंदू मंदिरावरील हल्ल्याचे खलिस्तानी कनेक्शन; दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या जवळचा अटकेत)

पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरेंना आवाहन, तुमच्यात दम असेल तर राहुल गांधींकडून सावरकर यांच्याबद्दल दोन शब्द चांगले बोलून दाखवा. आमची युती ही महाराष्ट्राच्या भल्यासाठी, शिवरायांच्या विचारांवर पुढे नेणारी… महाराष्ट्राला समृध्द करणारी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात (Congress manifesto) मुस्लिमांना 10 टक्के आरक्षण देण्याचा दावा म्हणजे 50 टक्के आरक्षण कमी करण्याचा घाट, ओबीसी आणि दलितांच्या आरक्षणाचा लाभ कमी करण्याचा प्रयत्न सत्ता हवी म्हणून विरोधक आंधळे झाले आहेत. पण जोपर्यंत संसदेत भाजपचा खासदार आहे तोपर्यंत मायनॉरिटीला आरक्षण मिळू देणार नाही.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.