केंद्रातील मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नांदेड इथे भाजपच्या महाजनसंपर्क अभियानांतर्गत सभेचे आयोजन करण्यात आले होते. अमित शहा या सभेचे प्रमुख पाहुणे होते. या सभेला संबोधित करताना केंद्रीय मंत्री अमित शहांनी उद्धव ठाकरेंसोबत राहूल गांधी, शरद पवार यांच्यावर जोरदार घणाघात केला. तसेच अमित शहांनी मुस्लिम आरक्षण ते तिहेरी तलाकवर उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी असे म्हणत जोरदार हल्लाबोल चढवला.
भर सभेतून अमित शहांचे उद्धव ठाकरेंना आव्हान
अमित शहा म्हणाले, “उद्धव ठाकरेंना माझे आव्हान आहे की, मुस्लिम आरक्षण ते तिहेरी तलाकवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. तसेच राम मंदिर ते मुस्लिम आरक्षण हवे की नको? यावरही त्यांनी भूमिका स्पष्ट करावी. उद्धव ठाकरे तुम्ही दोन दगडांवर पाय ठेवू नका. हिंमत असेल तर तुमची भूमिका स्पष्ट करुन दाखवा”, असे थेट आव्हान अमित शाहांनी उद्धव ठाकरेंना भर सभेतून दिले.
(हेही वाचा – अशोक चव्हाणांची मजल २जी, ३ जी आणि सोनियाजी यांच्या पलीकडे गेलीच नाही; देवेंद्र फडणवीसांचा टोला)
पुढे अमित शाह म्हणाले, “ज्यावेळी मी पक्षाचा अध्यक्ष होतो तेव्हा मी आणि देवेंद्र फडणवीस जागा वाटपाबद्दल चर्चा करण्यासाठी गेलो होतो. तेव्हा उद्धव ठाकरेंना ते मान्यही होते, परंतु निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एनडीए जिंकली त्यावेळी उद्धव ठाकरेंनी दिलेले वचन मोडले व सत्तेसाठी राष्ट्रवादी, काँग्रेससोबत गेले. दगा देण्याचेही कार्य उद्धव ठाकरेंनी केले असा गौप्यस्फोटदेखील अमित शाहांनी भाषणावेळी केला.
शहांनी फडणवीसांचा उल्लेख केला ‘दिग्गज नेता’
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. ते परदेशात गेले तर कुणी ऑटोग्राफ मागतेय, कुणी पाय धरतेय तर कुणी बॉस म्हणतंय.. मोदींचा करिष्मा जगभर पसरल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख दिग्गज नेता असा केला. मुख्यमंत्री पदाच्या काळात महाराष्ट्राला एक नंबर करण्यासाठी फडणवीसांनी परिश्रम घेतल्याचे अमित शहांनी सांगितले.
आगामी २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शहा म्हणाले की, या निवडणुकीत तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की, या देशाचा पंतप्रधान कोण बनावे? मोदींनी की राहुल गांधींनी व्हावे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community