Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात बंद दाराआड चर्चा

147
Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात बंद दाराआड चर्चा
Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात बंद दाराआड चर्चा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या मुंबई दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. (Amit Shah) लालबागच्या राजाच्या दर्शनानिमित्ताने 23 सप्टेंबर रोजी गृहमंत्री मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी दुपारी सपत्नीक लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे रवाना झाले. तिथे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीसांशी संवाद साधला. शिवसेना आमदारांची अपात्रतेची सुनावणी, संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार अन् अजित पवारांचा सरकारमधील प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर या तिन्ही नेत्यांत बंद दाराआड चर्चा केली. (Amit Shah)

(हेही वाचा – Fire In Train : गुजरातमधील वलसाडमध्ये हमसफर एक्सप्रेसला आग)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या मुद्यावरही चर्चा झाली. राज्य मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारावर देखील या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे बैठकीला उपस्थित नसल्याने चर्चांना उधाण आले आहे. (Amit Shah)

राजकीय घडामोडींना वेग

राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज, धनगर समाज आक्रमक झाला आहे, तर ओबीसी समाजही आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे राज्यातील सत्तासंघर्षांवर राज्यात सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमदार अपात्रता प्रकरणी एका आठवड्यात सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे घडामोडी वेगाने घडत आहेत. नार्वेकर नुकतेच दिल्लीला जावून कायदेतज्ञांचे मार्गदर्शन घेऊन आले. या विषयांवर नेत्यांमध्ये चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. (Amit Shah)

‘सह्याद्री’वरही बंद दाराआड चर्चा

विशेष म्हणजे सह्याद्री अतिथीगृहावरही अमित शाह, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची बंद दाराआड चर्चा झाली. सत्ताधारी तीन पक्षांमध्ये कसा समन्वय आहे, याचा आढावा अमित शाह यांनी यावेळी घेतला. तसेच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, लोकसभा निवडणूक यावरही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. (Amit Shah)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.