…तर गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवू; Amit Shah यांचा इशारा

166

याआधी या भागात मोठ्या प्रमाणात गोहत्येच्या घटना घडल्या होत्या. तुम्ही PM Narendra Modi यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, आम्ही गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवू आणि सरळ करू, असे केंद्रीय
गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) म्हणाले.

हे इंडी आघाडीचे लोक आज म्हणतात की POKबद्दल बोलू नका, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की, तुम्ही पाकिस्तानच्या अणुबॉम्बला घाबरताय, अरे पण मोदीजींच्या नेतृत्वात भारत एवढा मजबूत आहे की, घाबरण्याची गरज नाही. अणुबॉम्बची भीती बाळगण्याची गरज आहे, हे पीओके आमचे आहे आणि आम्ही ते घेऊ, असेही अमित शाह (Amit Shah) म्हणाले.

(हेही वाचा Arvind Kejriwal कारागृहाबाहेर आल्याने काँग्रेसचे नुकसान होणार की भाजपाचे; काय म्हणाले प्रशांत किशोर?)

रॅलीला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री शाह (Amit Shah) म्हणाले, नरेंद्र मोदी हे देशाचे पहिले मागास प्रवर्गातील पंतप्रधान आहेत. 50-60 च्या दशकात एक चर्चा व्हायची की, लोहियाजींचा सिद्धांत देशात चालेल की नाही. मला लोहियाजींना सलाम करून सांगायचे आहे की सर्वात मागास प्रवर्गातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला पुढे नेण्याचे काम केले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.