भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच सहकार क्षेत्राविषयीची माहिती संगणक प्रणालीत एकत्रितपणे संग्रहित झाली आहे. यातून सहकार क्षेत्र, त्याचा विस्तार आणि बळकटीकरणासाठी हा एक अतिशय महत्त्वाचा उपक्रम आहे, असे (Amit Shah) केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा म्हणाले. त्यामुळे सहकार क्षेत्राची व्याप्ती वाढून त्याला चालना मिळणार आहे. या डेटाबेसमुळे सहकार क्षेत्राशी संबंधित सर्व माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
(हेही वाचा – Sunil Gavaskar on Sarfraz Dismissal : गावसकर यांनी सर्फराझला दिला सर डॉन ब्रॅडमन यांनी दिलेला सल्ला)
राष्ट्रीय सहकारी डेटाबेसचे उद्घाटन :
नवी दिल्ली येथे राष्ट्रीय सहकारी डेटाबेसचे उद्घाटन केले. त्या सोबतच राष्ट्रीय सहकारी डेटाबेस २०२३ अहवालही प्रसिद्ध केला. कोट्यवधी लोकांना देशाच्या अर्थव्यवस्थेशी आणि विकासाशी जोडण्यासाठी सहकार मंत्रालय सक्रियपणे काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले. सहकाराचा विस्तार, डिजिटल विकास आणि डेटाबेसद्वारे वितरण यामध्ये सहकारी डेटाबेस महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असे अमित शहा (Amit Shah) म्हणाले. योग्य दिशेने विकासासाठी डेटाबेस मार्गदर्शन करेल आणि त्रुटीविषयीचे विश्लेषण करण्यासाठी ही माहिती अत्यंत प्रभावी ठरेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
सहकारिता क्षेत्र के राष्ट्रीय डेटाबेस के लाभ… pic.twitter.com/o1Kg9bjpVh
— Amit Shah (Modi Ka Parivar) (@AmitShah) March 8, 2024
(हेही वाचा – Hindus In Bangladesh : बांगलादेशातील मुसलमानांच्या छळाला कंटाळून १०० हिंदूंनी घेतला भारतात आश्रय)
माहितीचा एक अमूल्य साठा म्हणून सहकारी डेटाबेस काम करेल :
सहकार क्षेत्राच्या संगणकीकरणाशी संबंधित अनेक उपक्रम मोदी सरकारने हाती घेतले आहेत. धोरणकर्ते, संशोधक आणि संबंधित घटकांसाठी माहितीचा एक अमूल्य साठा म्हणून सहकारी डेटाबेस काम करेल. एका व्यापक वैज्ञानिक प्रणालीद्वारे या डेटाबेसमधील माहितीची सत्यता, अचुकता पडताळणीची आणि नियमित अद्ययावतीकरण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. केवळ पडताळून पाहिलेली अचूक माहितीच या डेटाबेसवर नियमितपणे उपलब्ध होईल याची काळजी गृह मंत्रालय घेईल, अशी ग्वाही अमित शहा (Amit Shah) यांनी दिली.
हेही पहा –