वीर सावरकर यांचा अवमान करणाऱ्या राहुल गांधींना अमित शाहांचे आव्हान, म्हणाले…

भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येताच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सवंग लोकप्रसिद्धीसाठी वीर सावरकर यांच्यावर टीका केली. त्यामुळे मोठा वाद झाला. त्याविषयी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी थेट राहुल गांधी यांनाच आव्हान दिले. वीर सावरकर यांच्यावर जे भाष्य करत आहेत, त्यांनी 10 दिवस अंदमानच्या सेल्युलर जेलच्या ‘त्या’ कोठडीत रहावे, जिथे वीर सावरकर 10 वर्षे राहिले आहेत, असे सांगत तसा कोणी वीर सावरकर नाही. वीर सावरकरांचा अर्थ समजून घेतला तर हा मुद्दा निकाली निघेल. वीर सावरकरांवर अशी भडक टिप्पणी करण्याचा अधिकार कोणालाही नाही. हे लोक जनतेसमोर गेल्यावर जनता त्यांना समजावेल, असेही शाह म्हणाले.

CAA कायद्याविषयी मोठे विधान 

सध्या गुजरात निवडणुकीची धामधूम सुरु आहे. भाजपचे नेते, केंद्रीय गृहमंत्री शाह हे गुजरातमध्येच ठाण मांडून आहेत. या दरम्यान शाह यांनी पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी थेट CAA कायद्याच्या विषयाला हात घातला. देशात दोन वर्षांपूर्वी ज्या कायद्यामुळे मुसलमानांनी आकांडतांडव केला होता तो CAA कायद्याच्या अंमलबजावणीला तात्पुरती स्थगिती आणली. त्यामुळे हा कायदा आता होणार नाही, अशी मुस्लिमांची धारणा झाली असली तरी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हा भ्रमाचा भोपळा फोडला आहे. त्यांच्या विधानाने मुस्लिमांच्या चिंता वाढली आहे.  जे लोक CAA कायदा लागू न होण्याचे स्वप्न पाहत आहेत ते चूक करत आहेत. कारण CAA हे या देशाचे वास्तव आणि कायदा आहे. हा कायदा लवकरच लागू होईल, कोरोनामुळे याला विलंब होत आहे, आम्हाला फक्त काही नियम बनवायचे आहेत आणि त्याची अंमलबजावणी केली जाईल असे अमित शाह म्हणाले.  या कायद्याअंतर्गत बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील सहा धार्मिक अल्पसंख्याकांना (हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन आणि शीख) भारताचे नागरिकत्व देण्याचा प्रस्ताव आहे. 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here