“भारताच्या राजकारणात सर्वात जास्त भ्रष्टाचारी शरद पवार आहेत. राज्यात शरद पवार (Sharad Pawar) यांनी भ्रष्टाचाराच्या संस्था तयार केल्यात. आम्ही 2014 ला मराठ्यांना आरक्षण दिले. सरकार कुणाचे आले आणि आरक्षण गेले? आता पुन्हा आम्ही सत्तेत आलो आणि आरक्षण आले. त्यामुळे आरक्षणासाठी भाजपचे सरकार यायला हवं. यांची सत्ता आली तर आरक्षण गायब होईल”, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी २१ जुलै रोजी झालेल्या पुण्यातील भाजपच्या मेळाव्यात केली होती. त्यानंतर आता त्यांनी थेट अजित पवार यांना फोन केला आहे.
(हेही वाचा – Mumbai Local Train Update: अति-मुसळधार पावसामुळे कल्याण येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड; मध्य रेल्वे विस्कळीत)
शरद पवारांचा हात सोडून भाजपच्या बाजूने गेलेले अजित पवार यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस असतो. या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अमित शाह यांनी फोन केला होता.
वाढदिवसाच्या शुभेच्छा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सकाळीच अजित पवार यांना दूरध्वनी करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अजित पवार यांनीही अमित शहा यांचे शुभेच्छांबद्दल आभार मानले आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीने ट्विट करत दिली. काल अमित शाह यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली होती आणि आज अजित पवारांना फोन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते, सर्वपक्षीय कार्यकर्ते, समाजाच्या विविध घटकातील मान्यवरांनी अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान अजित पवारांचा हा दौरा नेहमीपेक्षा वेगळा असून सभा न घेता थेट महिलांशी संवाद साधला जाईल आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नगर दक्षिण जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यावर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा भर राहील अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community