काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लोकशाही धोक्यात असल्याची ओरड करू नये, राहुल बाबा यांनी लोकशाहीची चिंता सोडावी, तुमचे कुटुंब धोक्यात आले आहे, असा हल्लाबोल गृहमंत्री अमित शाह यांनी केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी, ७ मार्च रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. कौशंबी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना शाह यांनी भाजपाच्या जागा ३०० च्या पलिकडे घेऊन जाण्याचा मानस व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जनतेने टाकलेल्या विश्वासामुळेच हे घडणार आहे. उत्तर प्रदेशातील कौशांबी येथील कडा धाम येथे कौशांबी महोत्सवाचे उद्घाटन करण्यासाठी गृहमंत्री उपस्थित होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक आणि केशव प्रसाद मौर्य यांनी गृहमंत्र्यांचे कौशांबी येथे आगमन झाल्यावर स्वागत केले. त्यानंतर गृहमंत्री माता शीतलाची पूजा करण्यासाठी कडा धाम येथे पोहोचले.
(हेही वाचा हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला बळ मिळण्यासाठी देशभरात 800 ठिकाणी हनुमान जयंतीनिमित्त गदापूजन!)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्याबाबत अमित शाह यांनी उपस्थितांना आवाहन केले. यावेळी गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर प्रदेशातील ६०० कोटींहून अधिक किमतीच्या ११७ प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. हे प्रकल्प कौशांबीच्या विकासाची नवी दिशा ठरवतील, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी काँग्रेस नेत्यांना खुले आव्हान देत तुम्ही मैदान निश्चित करा, भाजपचे कार्यकर्ते देशात कुठेही लढायला तयार आहेत, असे म्हटले.
Join Our WhatsApp Community