लोकसभा निकालानंतर दिल्लीत (Amit Shah) हालचालींना वेग आला आहे. सरकार स्थापन करण्यासाठी दिल्लीत मोठी घडामोड होत आहे. NDA ने डिनर डिप्लोमसीमधून मित्र पक्षांशी संवाद साधणार आहे. जुन्या आणि नवीन मित्रांच्या बळावर भाजपा सत्तेत तिसऱ्यांदा परत येत आहे. भाजपच्या वरिष्ठ नेते मित्र पक्षांची चर्चा करत आहेत.
(हेही वाचा –Maldives President Mohamed Muizzu यांनी सलग तिसऱ्या विजयाबद्दल केले पंतप्रधान मोदींचे अभिनंदन!)
काल (४ जून) रात्री अमित शहा (Amit Shah) यांनी मित्र पक्षाशी संवाद साधला आहे. त्यांनी फोनवरून एनडीए मधील सर्व मित्र पक्षांची चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मोदींच्या नेतृत्वाखाली सर्व पक्ष सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचे या चर्चेतून समोर आले. आज होणाऱ्या एनडीएच्या बैठकीत सरकार स्थापनेवर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Amit Shah)
(हेही वाचा –Mumbai Rain: मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा; ‘या’ भागांत मुसळधार पावसाच्या सरी)
राष्ट्रपतींकडून डिनरच आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे वरिष्ठ मंत्री डिनरला जाणार आहेत.राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडून समारोपीय डीनरचे आयोजन करण्यात आले आहे. एनडीएच्या बैठकीसाठी अजित पवारांना निमंत्रण देण्यात आले. मात्र, राष्ट्रवादीकडुन प्रफुल पटेल (Praful Patel) या बैठकीला उपस्थित राहतील. बैठकीत एनडीएचे सरकार स्थापन करण्याची चर्चा होईल. (Amit Shah)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community