- पवारसाहेब 50 वर्षांपासून राज्यातील जनता तुम्हाला सहन करतेय
- अवघा महाराष्ट्र गेल्या ५० वर्षापासून शरद पवारांचं ओझं वाहतोय
- शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचे आहे
- उद्धव ठाकरेंना मुलगा आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचे आहे
- सोनिया गांधी तिसऱ्यावेळी राहुल बाबाला लॉन्च करण्याचा प्रयत्न करत आहेत
पवारसाहेब (Sharad Pawar) 50 वर्षांपासून राज्यातील जनता तुम्हाला सहन करत आहे. 50 वर्षे राहू देत तुम्ही 5 वर्षांचा आढावा द्या. मी मोदी गॅरंटी देण्यासाठी आलो आहे. आमच्याकडे 10 वर्षांचा अनुभव आणि पुढील 25 वर्षांचे व्हिजन आहे, असा नेता पुन्हा पुन्हा नाही होत. तिसऱ्या वेळी सत्ता द्या, भारत जगाच्या अर्थव्यवस्थेत तिसऱ्या नंबरवर झेप घेईल, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी दिले. ते जळगाव येथे ५ मार्च रोजी झालेल्या प्रचारसभेत बोलत होते.
(हेही वाचा – Nitin Gadkari : मनमोहन सिंग यांचे सरकार मुके आणि बहिरे; नितीन गडकरी यांची काँग्रेस सरकारवर जोरदार टीका)
त्यांना मुला-मुलींना मुख्यमंत्री बनवायचे आहे
या वेळी अमित शाह यांनी महाविकास आघाडीच्या घराणेशाहीवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, राज्यात 3 चाकाची महाविकास आघाडीची ऑटो चालते, तिची तिन्ही चाके पंक्चर झाली आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगले काम करत आहेत. उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुलगा आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) मुख्यमंत्री करायचं आहे, शरद पवारांना सुप्रिया सुळेंना (Supriya Sule) मुख्यमंत्री करायचं आहे. जे पक्ष आपल्या पार्टीत लोकशाही नाही. परिवारवादाच्या पार्टी आहेत. त्या पार्टी देशात लोकशाही ठेवू शकतील का ? त्यांना त्यांच्या मुला-मुलींना मुख्यमंत्री बनवायचे आहे. सोनिया गांधी (Sonia Gandhi) सध्या तिसऱ्या वेळी राहुल बाबाला लॉन्च करण्याचा प्रयत्न करत आहेत. 2019 मध्ये लॉन्च झाले नाहीत. तुमच्यासाठी त्यांना काही नाही. तुमच्यासाठी फक्त मोदी आहेत.
370 कलम काँग्रेसने 70 वर्षे हटविले नाही
काश्मीर आपला हिस्सा आहे की नाही ? 370 कलम काँग्रेसने 70 वर्षे हटविले नाही. मोदींना दोनदा पंतप्रधान केले त्यांनी 370 हटविले. राहुल गांधी म्हणत होते रक्ताच्या नद्या वाहतील; पण रक्ताच्या नद्या सोडा; एक दगड उचलण्याची हिम्मत कुणाची झाली नाही, असेही अमित शाह (Amit Shah) म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community