Amit Shah आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, महायुतीच्या जागावाटपावर चर्चा होण्याची शक्यता

भाजपाकडून नुकतीच १९५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. याच पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा हा दौरा महत्वाचा ठरत आहे.

188
Amit Shah : CAA मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आज म्हणजेच मंगळवार ५ मार्च रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. राज्यातील ४८ लोकसभा जागांसाठी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यात अद्याप फॉर्म्युला तयार न झाल्याने त्यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

(हेही वाचा – Veer Savarkar: एका तासात एका लाखावर व्ह्यूज आणि दीड हजारांवर कॉमेंट्स… ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाचा टिझर हिट)

भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक :

मात्र, जागावाटपासाठी नाही तर निवडणुकीशी संबंधित बैठका आणि कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी अमित शहा (Amit Shah) महाराष्ट्रात आले आहेत, असे भाजपाने म्हटले आहे. चंद्रपूर, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वर्धा आणि अमरावती लोकसभा मतदारसंघांवर चर्चा करण्यासाठी अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी अकोला येथे पक्षाच्या निवडणूक व्यवस्थापन समितीची आणि कोअर कमिटीची बैठक होईल, असे महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

कोण किती जागांची मागणी करत आहे?

भाजप (Amit Shah) ३० पेक्षा जास्त जागा लढवण्याची शक्यता आहे, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने १० जागा मागितल्या आहेत, परंतु त्यांना चार जागा मिळण्याची शक्यता आहे, असे वृत्तसंस्थेने पीटीआयला दिले आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना १८ जागा लढवू इच्छित आहे.

(हेही वाचा – Advocate : सरकारी वकिलांच्या नेमणुकीचे बनावट आदेश; गृहविभागाच्या उपसचिवासह पाच जणांवर गुन्हा दाखल)

चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार …

महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अलीकडेच पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले होते की, जागा वाटपाच्या मुद्द्यावर केंद्रीय नेतृत्वासोबत चर्चा केली जात आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग असलेल्या अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मितकारी म्हणाले होते की, त्यांचा पक्ष पुण्यातील बारामतीसह १० जागा लढवू इच्छित आहे. (Amit Shah)

अशा परिस्थितीत जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही आणि अमित शहा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करून यावर तोडगा काढतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. (Amit Shah)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.