कर्नाटकातील परिस्थिती देश अनुभवतोय, मात्र महाराष्ट्र आपल्या हाती; Amit Shah यांचे मतदारांना आवाहन

74
कर्नाटकातील परिस्थिती देश अनुभवतोय, मात्र महाराष्ट्र आपल्या हाती; Amit Shah यांचे मतदारांना आवाहन
कर्नाटकातील परिस्थिती देश अनुभवतोय, मात्र महाराष्ट्र आपल्या हाती; Amit Shah यांचे मतदारांना आवाहन

महाविकास आघाडी म्हणजे महाविनाश, महायुती म्हणजे विकास. त्यामुळे कर्नाटकातील परिस्थिती देश अनुभवतोय, मात्र महाराष्ट्र आपल्या हाती आहे, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)यांनी दि. १३ नोव्हेंबर रोजी दोंडाईच्या सभेत महाविकास आघाडीवर हल्लाबोल करताना केले. पुढे ते म्हणाले, गांधी कुटुंबाच्या चार पिढ्या आल्या तरी अनुसूचित जाती जमाती आणि अन्य मागासवर्गीयांच्या आरक्षणात कपात करून मुस्लिमांना आरक्षण देण्याचा डाव यशस्वी होऊ दिला जाणार नाही, असा इशारा ही त्यांनी यावेळी महाविकास आघाडीला दिला. दोंडाईचा (जि. धुळे) येथील प्रचंड जाहीर सभेत ते बोलत होते. (Amit Shah)

महाविकास आघाडी म्हणजे महाविनाश, महायुती म्हणजे विकास!

तसेच महाराष्ट्रात मुस्लिमांना आरक्षण देण्याच्या उलेमा संघटनेच्या मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार करण्याच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आश्वासनावरून शाह यांनी काँग्रेस (Congress) व महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) चांगलेच धारेवर धरले. महाविकास आघाडी(Maha Vikas Aghadi) म्हणजे विनाश, आणि महायुती (Mahayuti) म्हणजे विकास हे स्पष्ट झाले असल्याने महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार पुन्हा सत्तेवर येणार आहे, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Amit Shah)

पुढे शाह म्हणाले की, याच महाविकास आघाडीने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर करण्यास विरोध केला, अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीस विरोध केला, ३७० कलम रद्द करण्यास विरोध केला आणि सर्जिकल स्ट्राईकलाही विरोध केला. तर दुसरीकडे शेकडो वर्षे जुनी मंदिरे, शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आणि लोकांची राहती घरेदेखील बघता बघता वक्फ बोर्डाच्या मालकीची झाली आहेत. आता महाआघाडीवाले वक्फ कायद्यात सुधारणा करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयासही विरोध करत आहेत. मात्र वक्फ कायद्याच्या मनमानीमुळे देशातील जनता त्रस्त आहे. कर्नाटकात काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर तेथील परिस्थिती देश अनुभवत असून गावेच्या गावे वक्फ बोर्डाची मालमत्ता असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे सावध रहा आणि काँग्रेस व आघाडीला सत्तेपासून दूर ठेवा असा इशाराही त्यांनी दिला. विनाश करणाऱ्यांच्या हाती राज्याची सत्ता द्यायची की विकासासाठी कटिबद्ध असलेल्या महायुतीकडे सत्ता द्यायची याचा निर्णय मतदारांनी करावयाचा आहे, असे ते म्हणाले. (Amit Shah)

यावेळी सभेच्या व्यासपीठावर सरकारसाहेब रावल, नयनकुंवर ताई रावल, आ. अमरीशभाई पटेल, डॉ. सुभाष भामरे, भाजपा प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, महायुतीचे उमेदवार राजवर्धन कदमबांडे, सुभाष देवरे, महायुतीचे धुळे जिल्ह्यातील उमेदवार जयकुमार रावल, काशीराम पावरा, अनुप अग्रवाल आदी उपस्थित होते. (Amit Shah)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.