Amit Shah मुंबईच्या दौऱ्यावर ; महायुतीच्या जागा वाटपाबाबत करणार चर्चा 

132

आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) प्रचारसंभासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारसभांसाठी कंबर कसायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रासह अनेक दिग्गज नेत्यांना लोकसभा निवडणुकीचा मोठा पराभव सहन करावा लागला होता. येत्या विधानसभा निवडणुकीत यांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी भाजपा (BJP) अॅक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाह (Amit Shah Mumbai Visit) मंगळवारी (०१ सप्टेंबर) पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. 

असा असेल दौरा 

अमित शाह मंगळवारी मुंबई आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. ते मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कोकणातील आमदार, पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. मुंबईतील आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांसोबत अमित शाह यांची दुपारी दीड वाजता बैठक आहे. दादरमधील स्वामी नारायण मंदिरातील (Swami Narayan Temple) योगी सभागृहात ही बैठक होणार आहे. तर नवी मुंबईतील सिडको ऑडिटोरियममध्ये सायंकाळी साडेचार वाजता ठाणे आणि कोकण विभागातील आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांसोबत अमित शाह संवाद साधणार आहेत. यानंतर ते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत रात्री सह्याद्री अतिथीगृहावर महायुतीच्या जागा वाटपाबाबत चर्चा करणार आहेत.

(हेही वाचा – उल्‍हास नदीत सोडले सांडपाणी; Thane महानगरपालिकेला १०२ कोटी रुपयांचा दंड)

दरम्यान दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ठाणे शहराजवळील कासारवडवली येथील वालावलकर मैदान येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम ५ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची या कार्यक्रमासाठी खास उपस्थिती राहणार आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.