नेहरूंनी (Jawaharlal Nehru) अनेक मोठ्या चुका केल्या. जेव्हा भारतीय सैन्य काश्मीरमध्ये विजयी मार्गाने पुढे सरकत होते, तेव्हा नेहरू युद्धबंदीसाठी संयुक्त राष्ट्रांकडे (UNO) गेले. या चुकीमुळे पाकव्याप्त काश्मीर आपल्या देशाचा भाग होता होता राहिला, असे घणाघाती उद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काढले आहेत. (Amit Shah on POK) ते संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Session of Parliament) तिसऱ्या दिवशी बोलत होते.
(हेही वाचा – Investment Websites Ban : गुंतवणुकीच्या बनावट योजना चालवणाऱ्या १०० च्या वर वेबसाईटवर सरकारची कारवाई )
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी जम्मू-काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक 2023 राज्यसभेत सादर केले. त्या वेळी काश्मीरमधील आतंकवादासाठी (Terrorism) त्यांनी काॅंग्रेसला (Congress) जबाबदार धरले.
… ती नेहरू सरकारची घोडचूक
गृहमंत्री पुढे म्हणाले, “मला वाटत नाही की, आपण युद्धबंदीसाठी संयुक्त राष्ट्रांत जायला हवे होते. जरी नेहरू गेले असले, तरी त्यांनी हे प्रकरण संयुक्त राष्ट्रांच्या सनदेच्या योग्य कलमांतर्गत उचलायला हवे होते. हा नेहरू सरकारचा केवळ दोष नव्हता, तर ती घोडचूक होती. त्यामुळे झालेले नुकसान देशाला आजतागायत सोसावे लागत आहे.”
Speaking in the Lok Sabha on two landmark bills related to the Jammu and Kashmir. https://t.co/w4PqoAsiZX
— Amit Shah (@AmitShah) December 6, 2023
चर्चेदरम्यान, अमित शहा यांनी काश्मीरच्या चुकांसाठी नेहरूंचे नाव घेतल्यावर काँग्रेस नेते संतप्त झाले. त्यापैकी काहींनी संसदेतून सभात्यागही केला. (Winter Session of Parliament)
(हेही वाचा – Maharashtra Assembly winter Session : अधिवेशनाच्या काळात सरकारच्या विरोधात ‘मोर्चे’ बांधणी)
दहशतवादाच्या घटनांत 70 टक्के घट
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि मनमोहन सिंग यांच्यावरही हल्ला चढवला. ते म्हणाले, ”1994 ते 2004 या काळात दहशतवादाच्या एकूण 40,164 घटना घडल्या. 2004-14 दरम्यान सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात दहशतवादाच्या 7,217 घटना घडल्या होत्या. नरेंद्र मोदी सरकारच्या काळात 2014 ते 2023 या काळात दहशतवादाच्या केवळ 2000 घटना घडल्या. त्यात 70 टक्के घट झाली आहे.” (Amit Shah on POK)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community