राहुल गांधींच्या संसदेत बोलू न दिल्याच्या आरोपावर Amit Shah यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, त्यावेळी ते व्हिएतनाममध्ये…

77
राहुल गांधींच्या संसदेत बोलू न दिल्याच्या आरोपावर Amit Shah यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, त्यावेळी ते व्हिएतनाममध्ये...
राहुल गांधींच्या संसदेत बोलू न दिल्याच्या आरोपावर Amit Shah यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, त्यावेळी ते व्हिएतनाममध्ये...

संसदेच्या कामकाजावर टीका करणाऱ्या काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लक्ष्य केले आहे. त्यांनी म्हटले की, लोकसभेत बोलण्यासाठी त्यांना जेव्हा वेळ दिली होती, तेव्हा लोकसभेचे विरोधी पक्षनेते व्हिएतनाममध्ये (Vietnam) होते, अशी टीका शाह (Amit Shah) यांनी केली. तसेच कर्नाटकात काँग्रेस (Congress) सरकारने मुस्लिमांसाठी जाहीर केलेले चार टक्के आरक्षण (Muslim reservation) म्हणजे ‘लॉलीपॉप’ आहे, असेही शाह (Amit Shah) म्हणाले.

( हेही वाचा : Bangkok Earthquake : म्यानमार भूकंपातील मृतांची संख्या १६७ वर, ७३० जखमी

कर्नाटकात काँग्रेस (Congress) सरकारने मुस्लिमांना दिलेल्या आरक्षणाबद्दल शाह (Amit Shah) पुढे म्हणाले की, “धर्माच्या आधारावर देण्यात येणारे कोणत्याही प्रकारचे आरक्षण हे संविधानाचे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे न्यायालये ते रद्द करतील. धर्माच्या आधारावर देण्यात येणाऱ्या आरक्षणाला आमचा विरोध आहे”, अशी कठोर भूमिकाही त्यांनी घेतली. अमित शाह यांनी, “संसद नियमांनुसार चालते, काँग्रेस (Congress) पक्षाप्रमाणे नाही, जो एका कुटुंबाद्वारे चालवला जातो. जिथे तुम्ही तुम्हाला हवे तेव्हा बोलू शकता”, अशीही टीकाही यावेळी केली.

तसेच “सभागृहात बोलण्याचे काही नियम आहेत जे, लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्याला कदाचित माहित नसतील. जे मनमानी पद्धतीने पाळता येत नाहीत.”, असा टोलाही शाह (Amit Shah) यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर लगावला आहे. त्याचबरोबर “त्यांना अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलण्यासाठी ४२ टक्के वेळ देण्यात आला होता. आता कोण बोलणार हे त्यांनी ठरवायचे आहे. पण, जेव्हा संसदेत गंभीर चर्चा सुरू होती तेव्हा ते व्हिएतनाममध्ये (Vietnam) होते आणि जेव्हा ते परतले तेव्हा त्यांनी त्यांच्या इच्छेनुसार बोलण्याचा आग्रह धरला.”, असेही शाह (Amit Shah) यांनी सांगितले.

हेही पाहा : 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.