Amit Shah: “परदेशात जाऊन देशाचा अपमान करणाऱ्यांना धडा मिळाला”, अमित शहांचा राहुल गांधींवर निशाणा

166
Amit Shah:
Amit Shah: "परदेशात जाऊन देशाचा अपमान करणाऱ्यांना धडा मिळाला", अमित शहांचा राहुल गांधींवर निशाणा

हरियाणा निवडणुकीत (Haryana Assembly Election 2024 Result) भाजपला बहुमत मिळाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी राहुल गांधींना (Rahul gandhi ) जोरदार टोला लगावला आहे. परदेशात जाऊन देशाचा अपमान करणाऱ्याला हरियाणाच्या जनतेने धडा शिकवल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवला असून काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निवडणुकीत भाजपाने ४८ तर काँग्रेसने ३७ जागांवर विजय मिळवला आहे. याशिवाय भारतीय लोकदल पक्षाने २ तर अपक्षांना ३ जागांवर विजय मिळाला आहे. (Amit Shah)

“राजकारणात आता एक नवीन युग”

निवडणुकीतील विजयावर प्रतिक्रिया देताना अमित शाह (Amit Shah) म्हणाले की, “केंद्रात तिसऱ्यांदा स्थापन झालेलं भाजपाचे सरकार असो किंवा हरियाणा, गुजरात, मध्य प्रदेशसह इतर राज्यांमध्येही पुन्हा निवडून आलेलं सरकार असो. यावरून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने अवलंबलेली धोरणे जनतेने स्वीकारल्याचे दिसून येते. या विजयासह भारतीय राजकारणात आता एक नवीन युग सुरू झाले आहे. जनतेचा आमच्यावर अतूट विश्वास आहे. भाजपाला सलग तिसऱ्यांदा राज्याची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी हरियाणाच्या जनतेचे मनापासून आभार मानतो.”

“काँग्रेसने खोटी आश्वासने दिली”

“आधी लोकसभा निवडणुकीत आणि आता हरियाणात मत मिळवण्यासाठी काँग्रेसने खोटी आश्वासने दिली. मात्र, जनतेने त्यांना पूर्णपणे नाकारले आहे. जनता भाजपाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. शेतकऱ्यांची आणि सैनिकांची भूमी असलेल्या हरियाणाने आपल्या व्होट बँकेसाठी परदेशात जाऊन देशाचा अपमान करणाऱ्यांना धडा शिकवला आहे.” असा हल्लाबोल अमित शाहांनी राहुल गांधींवर केला आहे. (Amit Shah)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.