निरक्षर नागरिक देशावरील ओझे… काय म्हणाले अमित शहा?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसद टीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीत निरक्षर लोक देशाच्या प्रगतीत अडथळा असल्याचं म्हटलं आहे. निरक्षर लोक कधीही देशाचे चांगले नागरिक होऊ शकत नाहीत, असे नागरिक देशाचे ओझे असल्याचं अमित शहा यांनी या मुलाखतीत म्हटले आहे.

निरक्षर व्यक्ती देशासाठी भार

शाळांमध्ये पटसंख्या वाढवण्यामध्ये सध्याच्या सरकारने कशा प्रकारे योगदान दिले आहे, याबाबत अमित शहा यांनी भाष्य केले. निरक्षर व्यक्ती देशावर एक भार आहेत, कारण त्याला किंवा तिला निरक्षर असल्याने घटनेने दिलेल्या अधिकारांची माहिती नसते. त्याचप्रमाणे, अशा व्यक्तींना त्याच्या कर्तव्यांची किंवा जबाबदाऱ्यांची माहिती नसते. अशी व्यक्ती एक चांगला नागरिक कसा बनू शकते?, असा सवालही शहा यांनी उपस्थित केला. गुजरातमधल्या मुलांचे शाळा सोडण्याचे प्रमाण 37 टक्क्यांवरुन 1 टक्क्यांपर्यंत कमी करण्यास मदत करणारे पाऊल उचलल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आणि त्यांना “लोकशाही नेता” म्हणून गौरवले.

(हेही वाचाः त्यावेळी भाजपाची अवस्था बिकट होती, पण… अमित शहा म्हणाले मोदींनी अशी केली आव्हानांवर मात)

टीकाटारही सहमत असतील

मोदी आणि त्यांची कार्यशैली दोन्ही मी जवळून पाहिल्या आहेत. त्यांच्यासारखा उत्तम श्रोता मी आजवर पाहिलेला नाही. काहीही असो, ते प्रत्येकाचं ऐकतात आणि कमीत-कमी बोलतात. त्यानंतरच ते योग्य तो निर्णय घेतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी एक निरंकुश नेते असल्याचं शहा म्हणाले. म्हणूनच, ते कठोर आणि धोकादायक निर्णय घेण्यास अजिबात संकोच करत नाहीत. पक्षाच्या समर्थकांविरुद्ध जरी असले तरी ते त्याचा विचार करत नाहीत. देश आणि लोकांच्या हिताचे असलेले निर्णय ते निसंकोचपणे घेतात.

(हेही वाचाः आज ‘महाराष्ट्र बंद’… मग वसुलीचं काय?)

मोदींचे टीकाकारही या गोष्टीवर सहमत असतील की आताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने लोकशाही पद्धतीने काम केले आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here