शरद पवारांच्या कार्यकाळात भ्रष्टांचारामुळे राज्यातील २०० पैकी १०१ साखर कारखाने मृत्यूपंथाला लागले, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दि. ८ नोव्हेंबरला सांगलीत केला. भाजपचे उमेदवार आ. सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत गृहमंत्री शहा बोलत होते.
( हेही वाचा : मुंबईकरांनो, रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवर Megablock ! घराबाहेर पडण्याआधी वेळापत्रक वाचा…)
यावेळी मंत्री शाह म्हणाले की, सांगलीत आशिया खंडातील सर्वांत मोठा वसंतदादा सहकारी साखर कारखाना उभारला होता. मात्र तोही विकण्याचा प्रयत्न शरद पवारांच्या कार्यकाळात झाला. त्यामुळे सहकारातील संस्था कोणी आणि कशासाठी मोडल्या, याचे उत्तर शरद पवारांनी द्यावे, असे ही शाह म्हणाले. दरम्यान मोदी सरकारने सहकारी साखर कारखान्याच्या साखरेवरील प्राप्तिकर हटवून शेतकऱ्यांना १५ हजार कोटींचा फायदा दिला आहे, अशी माहिती ही गृहमंत्री अमित शाह यांनी दिली.
हेही पाहा :