अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच आपल्या कार्यक्रमात आहेत. माझ्यासोबत ते पहिल्यांदाच बसलेले आहेत, त्यामुळं सर्वात आधी मी त्यांना सांगू इच्छितो की, अजितदादा आज तुम्ही योग्य ठिकाणी बसलेला आहेत. हीच तुमची योग्य जागा आहे, याठिकाणी बसण्यासाठी तुम्ही थोडा उशीरच केला, असं मोठं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यातील जाहीर कार्यक्रमात केलं आहे.
…म्हणून मी महाराष्ट्रात सर्वांना घेऊन आलोय
देश एका बाजूला आहे आणि महाराष्ट्र एका बाजूला आहे. कारण देशातील सहकारी संस्थांच्या तुलनेत एकट्या महाराष्ट्राचा वाटा हा 42 टक्के आहे. महाराष्ट्राचं हेच योगदान दाखवण्यासाठी मी इथं सर्वांना घेऊन आलो आहे, असं ते म्हणाले.
(हेही वाचा Ajit Pawar : अमित शाह महाराष्ट्राचे जावई; राज्यावर विशेष प्रेम – अजित पवार)
अजित पवार काय म्हणाले?
नरेंद्र मोदी यांचं सहकारातून समृद्धीचं लक्ष प्राप्त करण्यासाठी अमित शाह यांचा विभाग प्रयत्न करत आहे. अमित शाह गुजरातमधून येतात, पण अधिक प्रेम महाराष्ट्रावर करतात, असं अजित पवार म्हणाले. अजित पवार यांनी हे सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला. यावर अजित पवार यांनी कारण सांगितलं, ते म्हणाले अमित शाह महाराष्ट्राचे जावई आहेत. आपण मान्य केलं नाही तर जावयाला सासरच्या लोकांवर जास्त प्रेम असतंच. अमित शाह यांच्या नेतृत्त्वात वेब पोर्टलचं उद्घाटन हे महत्त्वाचं पाऊल आहे. महाराष्ट्र आणि देशातील सहकारी संस्थांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण होईल, असं अजित पवार म्हणाले.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
महाराष्ट्राची भूमी सहकाराची भूमी आहे. महाराष्ट्रात सहकाराची मुहूर्तमेढ रोवली गेली. देशात सर्वाधिक सहकार महाराष्ट्रात ग्रामपातळीपर्यंत पोहोचला. मोठं सहकार क्षेत्र महाराष्ट्रात निर्माण झालं. अमित शाह यांनी सहकार मंत्रालय स्वीकारल्यानंतर नवा कायदा केला. गावपातळीवर सहकाराचं जाळं नेलं पाहिजे यासाठी व्यवस्था निर्माण केली त्यासाठी पोर्टल निर्माण केलं. त्या पोर्टलचं उद्घाटन अमित शाह यांनी महाराष्ट्रात पुण्याची निवड केली, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. अजित पवार म्हणाले की अमित शाहांचं महाराष्ट्रावर प्रेम आहे, ते महाराष्ट्राचे जावई आहेत हे खरं आहे. पण, अमित शाह यांचा जन्म मुंबईत झाला आहे. अमित शाह राजकारणात नव्हते त्यावेळी उद्योग करत होते. त्यांचा उद्योग महाराष्ट्रात होता, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Join Our WhatsApp Community