Madhya Pradesh : मध्य प्रदेशाला काँग्रेसने अंधारात ठेवले; अमित शाह यांचा हल्लाबोल

102
तुमच्या एका मतामुळे येत्या पाच वर्षात येथे कोणाचे सरकार येणार हे निश्चित होईल. इथे एका बाजूला मध्य प्रदेश (Madhya Pradesh) ला आजारी राज्य बनवून अनेक वर्षे अंधारात ठेवणारी काँग्रेस आहे. तर दुसरीकडे 18 वर्षात शेतकरी, महिला, आदिवासी आणि तरुणांच्या कल्याणासाठी काम करणारे भाजपा सरकार आहे. काँग्रेसने येथे सत्ता असताना केवळ स्वत:चे घर भरण्याचे काम केले, तर भाजपाने विकासासाठी काम केले, अशी टीका भाजपचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली.

काँग्रेस पक्षाने प्रत्येक गोष्टीला विरोध केला

मी आज कमलनाथ त्यांच्यात थोडीही हिंमत असेल तर त्यांनी माझ्या प्रश्नांना उत्तर द्यावे. 2002 मध्ये त्यांनी मध्य प्रदेश (Madhya Pradesh) सोडला तेव्हा येथील बजेट फक्त 23 हजार कोटी रुपये होते. आज भाजपाच्या 18 वर्षांच्या राजवटीत येथील अर्थसंकल्प 3 लाख 14 हजार कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. काँग्रेसने एससी, एसटी आणि ओबीसींसाठी केवळ एक हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प दिला होता. तो 64 हजार कोटींपर्यंत वाढवण्याचे काम आम्ही केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगामध्ये भारताचा गौरव करण्याचे काम केले आहे, तर काँग्रेस पक्षाने प्रत्येक गोष्टीला विरोध केला होता. केंद्रात काँग्रेसचे मनमोहन सिंग सरकार असताना पाकिस्तानातून दहशतवादी दररोज देशात घुसून बॉम्बस्फोट घडवून आणायचे, पण सरकारने काहीही केले नाही. मग तुम्ही मोदीजींना भरघोस जागा देऊन भाजपाचे सरकार बनवले. 10 दिवसांतच भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या घरात घुसून सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राइक करून दहशतवाद्यांचा खात्मा केला. मोदीजींनी देशाच्या सीमा सुरक्षित करण्याचे काम केले आहे, असेही शाह म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.