विदर्भ, मराठवाड्यानंतर Amit Shah यांच्या टार्गेटवर मुंबई

मुंबईसाठी अमित शाह यांचे विशेष प्लॅनिंग

112
विदर्भ, मराठवाड्यानंतर Amit Shah यांच्या टार्गेटवर मुंबई
  • प्रतिनिधी

विदर्भासह मराठवाड्यातील पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर आता मुंबईतील जागांचा आढावा आणि पदाधिकारी संवादासाठी ज्येष्ठ भाजपा नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) दोन दिवसांच्या मुंबई दौर्‍यावर येत आहेत. एक आणि दोन ऑक्टोबर रोजी मुंबई आणि मुंबई उपनगर तसेच कोकणातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे.

मुंबईत प्रमुख पदाधिकाऱ्यांस समवेत संवाद

राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) एक ऑक्टोबर रोजी मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार असून दादर येथील योगी सभागृह येथे भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद देखील साधणार आहेत.

(हेही वाचा – Navi Mumbai Airport चे काम प्रगतीपथावर; सुखोईच्या लँडिंगसाठी सज्ज)

डेंजर मतदारसंघांचाही आढावा

अमित शाह (Amit Shah) स्वतः मुंबईतील या दौऱ्यादरम्यान मुंबईतील डेंजर झोनमधील मतदारासंघांचा विभागनिहाय आढावा घेणार आहेत. त्यासोबतच अमित शाह मुंबईत कार्यकर्त्यांशी संवादही साधणार आहेत. त्यामुळेच या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्यामुळे मुंबई भाजपा अलर्ट मोडवर आली असून मुंबई भाजपाचे नेतेच नाही तर कार्यकर्ते देखील कामाला लागले आहेत. पुढील तीन दिवस मतदारसंघ पिंजून काढण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. ज्यामध्ये पुढच्या तीन दिवसात मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा एक रिपोर्ट तयार केला जाणार आहे. हा रिपोर्ट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सादर केला जाणार आहे.

असमाधानकारक कामगिरी असणाऱ्या आमदारांचे टेन्शन वाढले

केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या या दौऱ्यामुळे प्रत्येक विधानसभा क्षेत्राचा आढावा घेतला जात असताना डेंजर झोन मध्ये असलेले आमदार किंवा असमाधानकारक कामगिरी असणाऱ्या आमदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ज्यांची कामगिरी समाधानकारक नाही त्या आमदारांचे टेंशन वाढणार आहे.

(हेही वाचा – उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर अज्ञात महिलेकडून तोडफोड!)

महायुतीतील नेत्यांशीही चर्चा

या दौर्‍यात शाह (Amit Shah) हे महायुतीच्या नेत्यांसोबतही चर्चा करणार आहेत. या बैठकीत महायुतीच्या जागावाटपावर अंतिम चर्चा होण्याची शक्यता आहे. यावेळी जागावाटपासह पहिल्या टप्प्यातील उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. शाह यांच्या दौर्‍याच्या नियोजनासाठी भाजपा प्रदेश कार्यालयात राज्याचे प्रभारी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. मुंबईतील कार्यक्रमांच्या तयारीचा आढावा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री मंगल प्रभात लोढा, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आदी नेते घेणार आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.