ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी, १६ एप्रिलला महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह विविध नेतेमंडळींच्या उपस्थितीत आप्पासाहेब धर्माधिकारींना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सोहळा नवी मुंबई येथील खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर दिमाखात संपन्न झाला. आप्पासाहेबांना महाराष्ट्र भूषण देऊन लाखो लोकांना जगण्याची प्रेरणा देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केल्याचे गौरोद्गार अमित शाह यांनी काढले.
अमित शाह म्हणाले की, ‘ही एवढी मोठी गर्दी मी माझ्या जीवनात कधीही पाहिली नाही. ही गर्दी तुमच्या मनातील आप्पासाहेबांबद्दलचा मान, सन्मान, भक्तीभाव दाखवून देते. अशा प्रकारचा मान, सन्मान, भक्तीभाव फक्त त्याग, सर्मपण आणि सेवेमुळे मिळतो, जे आप्पासाहेबांच्या आतमध्ये आहे. हा त्यांच्या कर्तुत्त्वाचा आणि नानासाहेबांच्या शिकवणीचा सन्मान आहे. समाजसेवेचे संस्कार तीन पिढ्यात राहतात हे मी प्रथम पाहत आहे. आप्पासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन लाखो लोकांना जगण्याची प्रेरणा देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सरकारने केले.’
पुढे शाह म्हणाले की, ‘आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी समाजाला दिलेली शिकवण ही शाश्वत आहे. धर्म आणि मंत्रोच्चारांनी दिलेली शिकवण ही अल्पजीवी ठरत असते. दुसऱ्यांसाठी जगणारी माणसे या जगात कमी आहेत.’
(हेही वाचा – पुरस्काराची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचे आप्पासाहेब धर्माधिकारींनी केले जाहीर)
Join Our WhatsApp Community