Amit Shah : ईशान्येकडील प्रदेशात शांततेच्या नव्या आणि शाश्वत युगाची सुरुवात – अमित शाह

ईशान्य प्रदेश पूरमुक्त आणि अमलीपदार्थ मुक्त करण्यावर भर द्यायला हवा, ईशान्य अंतराळ उपयोजन केंद्राचा उपयोग करून जलव्यवस्थापनाला बळकटी द्यायला हवी, असे अमित शाह यांनी सांगितले.

171
Amit Shah : ईशान्येकडील प्रदेशात शांततेच्या नव्या आणि शाश्वत युगाची सुरुवात - अमित शाह

स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांत ईशान्येच्या विकासामध्ये पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील गेली १० वर्षे सर्वांत महत्त्वपूर्ण ठरली. या १० वर्षांत पायाभूत सुविधांच्या निर्मितीमुळे ईशान्य ते दिल्ली आणि उर्वरित भारताचे अंतर कमी होण्याबरोबरच मनभेदही कमी झाले. ईशान्येकडील विविध वांशिक, भाषिक, सीमा आणि अतिरेकी गटांशी संबंधित समस्यांशी झगडत असलेल्या ईशान्येकडील प्रदेशात या १० वर्षांत शांततेच्या नव्या आणि शाश्वत युगाची सुरुवात झाली, असे मत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी व्यक्त केले. शिलाँगमध्ये ईशान्य परिषदेच्या ७१ व्या पूर्ण सत्राला त्यांनी संबोधित केले.

(हेही वाचा – China Kabutar: हेरगिरीच्या संशयावरून ताब्यात घेतले ‘चिनी कबूतर’, ८ महिन्यांपासून पिंजऱ्यात बंदिस्त)

काय म्हणाले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ?

अटलजींच्या काळात, ईशान्य प्रदेशाला प्राधान्य देऊन, त्यासाठी स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती करण्यात आली आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ॲक्ट ईस्ट,ॲक्ट फास्ट आणि ॲक्ट फर्स्ट हे तीन मंत्र अंमलात आणले जात आहेत. यासोबतच भारत सरकारच्या सर्व मंत्रालयांमध्ये ईशान्य प्रदेशाला प्राधान्य देऊन प्रोत्साहन दिले जात आहे. (Amit Shah)

(हेही वाचा – Facebook : फेसबुकने सर्वात आधी ‘या’ मुलीला नोकरीवर ठेवले होते. कोण आहे ही मुलगी?)

प्रशासनात तंत्रज्ञानाच्या वापराला चालना –

ईशान्य परिषदेने (एनईसी) आपल्या स्थापनेपासून ५० वर्षांमध्ये, सर्व राज्यांना धोरणाशी संबंधित मंच उपलब्ध करून देऊन तसेच त्यांच्या समस्यांचे निराकरण सुलभ करून प्रदेशाच्या विकास अधिक गतिमान केल्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली ॲक्ट ईस्ट पॉलिसी अंतर्गत एनईसीची भूमिका आणि व्याप्ती वाढवण्यात आली आहे. यासोबतच ईशान्य अंतराळ उपयोजन केंद्र (एनईएसएसी) चा वापर करून प्रशासनात तंत्रज्ञानाच्या वापराला चालना देण्याचे कामही करण्यात आले असल्याचेही शाह यांनी सांगितले. ईशान्येकडील भाषा, संस्कृती, खाद्यपदार्थ, पोशाख आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे या क्षेत्राला जागतिक पर्यटनात मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी (Amit Shah) व्यक्त केला.

प्रदेश पूरमुक्त आणि अमलीपदार्थ मुक्त करण्यावर भर –

ईशान्य प्रदेश पूरमुक्त आणि अमलीपदार्थ मुक्त करण्यावर भर द्यायला हवा, ईशान्य अंतराळ उपयोजन केंद्राचा उपयोग करून जलव्यवस्थापनाला बळकटी द्यायला हवी, असे अमित शाह (Amit Shah) यांनी सांगितले.

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) पुढे बोलताना म्हणाले की, “मोदी सरकारने ईशान्येसाठी २०२२ – २३ ते २०२५ – २६ या वर्षासाठी ४८०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे आणि अर्थसंकल्पीय तरतुदीत सुमारे १६२ टक्के वाढ केली आहे.

(हेही वाचा – BMC’s QR Code Identity Cards : महापालिकेच्या बनावट ओळखपत्रांना आळा; नव्याने बनतात क्युआर कोड आधारीत ओळखपत्रे)

… तर १३ लाख लोकांना रोजगार मिळणार –

जर ईशान्य प्रदेश सेंद्रिय उत्पादने, दुग्धव्यवसाय, मासेमारी आणि अंडी उत्पादनात आत्मनिर्भर झाला तर केवळ या ४ क्षेत्रात १३ लाख लोकांना रोजगार मिळू शकेल असे शाह यांनी नमूद केले. केवळ प्रदेशाचा विकास पुरेसा नाही, तर प्रदेशाबरोबरच व्यक्तीचाही विकास व्हायला हवा आणि त्यासाठी औद्योगिक उत्पादन आणि शेती हेच पर्याय आहेत, असे अमित शाह (Amit Shah) म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.