Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १००व्या भागासाठी भाजपने मुंबईतील विलेपार्ले येथील डहाणूकर महाविद्यालयात कार्यक्रम आयोजित केला आहे.

178
Amit Shah
Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षातून बंड करून भाजपसोबत हातमिळवणी केल्यापासून राज्यातील राजकारण रोज वेगवेगळं वळण घेत आहे. त्यामुळे राजकारणात सध्या अनेक गोष्टी घडत आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार देखील बंड करणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. अशातच गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचा मुंबई दौरा चर्चेचा विषय ठरत आहे.

(हेही वाचा – Mann Ki Baat: मुंबईत ५ हजार ठिकाणी ‘मन की बात’चे आयोजन)

मिळालेल्या माहितीनुसार रविवार ३० एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) मुंबई दौरा करणार आहेत. मुंबईत एका कौटुंबिक विवाह सोहळ्यासाठी ते येत असल्याचे सांगितले जात असले तरी राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाच्या १००व्या भागानिमित्त विलेपार्ले येथे होणाऱ्या कार्यक्रमात देखील अमित शहा हे सहभागी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

हेही पहा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १००व्या भागासाठी भाजपने मुंबईतील विलेपार्ले येथील डहाणूकर महाविद्यालयात कार्यक्रम आयोजित केला आहे. यासाठी ते (Amit Shah) उपस्थित राहणार आहेत. दुसरीकडे या मुंबई भेटीवरून राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. या कार्यक्रमात भाजप नेत्यांबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांच्या उपस्थितीबाबत भाजपने अधिकृत माहिती दिलेली नाही.

मन की बात @१००

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ (Mann Ki Baat) कार्यक्रमाच्या १००व्या पर्वासाठी मुंबई भाजपाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुंबईसह उपनगरातील ३६ विधानसभेतील ५ हजाराहून अधिक ठिकाणी ‘मन की बात’ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ऐकण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे, कार्यक्रमाचे प्रसारण सकाळी ११ वाजता होणार आहे.

अलीकडेच ‘मन की बात’ कार्यक्रमाविषयी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अहवाल सादर केला आहे. त्या सर्वेक्षणानुसार ‘मन की बात’ (Mann Ki Baat) १०० कोटी श्रोत्यांपर्यंत पोहोचली आहे. ‘मन की बात’चे २३ कोटी नियमित श्रोते आहेत. ९६ टक्के लोकांना या कार्यक्रमाबाबत माहिती आहे, त्यांनी एकदा तरी हा कार्यक्रम ऐकला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.