शिवसेना आमदार भाजपला सत्तास्थापनासाठी देणार पाठिंबा; अमित शहा घेणार आमदारांची भेट?

शिवसेनेचे 20 पेक्षा अधिक आमदार गायब असल्याने पक्ष फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या आमदारांनी पक्षाविरोधात बंड केले आहे. इतक्या मोठ्या संख्येने शिवसेना आमदार नाराज असल्याने, महाविकास आघाडीचे भवितव्याबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकनाथ शिंदे आणि अन्य आमदार हे भाजपच्या संपर्कात असल्याची बातमी समोर येत आहे. त्यातच आता भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या सर्व आमदरांची भेट घेतील, अशी माहिती समोर येत आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे पक्षनेतृत्वाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे या संकटातून मार्ग काढण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे नेमकी काय पावले उचलतात, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

( हेही वाचा: मोदींना काँग्रेसकडून किमान 80 वेळा शिव्या; भाजपकडून नेत्यांच्या नावांची यादी जाहीर )

 

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here