केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान ताफ्यात शिरण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदर प्रकार केंद्रीय गुप्तचर यंत्रणेच्या सतर्कतेमुळे समोर आला. यानंतर शनिवारी रात्री सोमेश धुमाळ याला ताब्यात घेण्यात आले आहे.
अमित शाह यांचे शनिवारी सायंकाळी पुण्यात आले होते. त्या दरम्यान त्यांनी सेनापती बापट रस्त्यावरील एका तारांकित हाॅटेलमध्ये काश्मिरमध्ये हौतात्म्य पत्करलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांशी संवाद साधला. या कार्यक्रमात दाखल होण्यापूर्वी त्यांच्या ताफ्यात एकाने गाडी घालण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगून त्याने गाडी मध्ये घातली. मात्र केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडे ताफ्यातील वाहनांची यादी होती. यादीत धुमाळ याच्या वाहनाचा क्रमांक नव्हता. स्थानिक पोलिसांनी या तरुणाचा पाठलाग करत त्याला गाठले. चतु:शृंगी पोलिसांनी सोमेशला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या ताब्यात दिले. जेडब्ल्यू मॅरेट हॉटेलमधून या संशयिताला ताब्यात घेण्यात आले. चतु:शृंगी पोलिसांकडून अधिक चौकशी करण्यात आली.
( हेही वाचा: देव तारी त्याला कोण मारी:भूकंपाच्या 10 दिवसांनंतरही तिघांची ढिगाऱ्याखालून सुखरूप सुटका; मृतांचा आकडा 45 हजारांवर )
Join Our WhatsApp Community