भाजप पुन्हा सत्तेत येणार – अमित  शाहांचा विश्वास 

94

भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात पुन्हा एकदा मोठी भविष्यवाणी केली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा सत्तेवर येईल, असा दावा त्यांनी केला आहे. एवढेच नाही, तर जागांचा अंदाज वर्तवत, नरेंद्र मोदी किती जागां जिंकत तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार हेही त्यांनी यावेळी सांगितले. अमित शाह आसाममधील दिब्रुगड येथे एका जाहीर सभेत बोलत होते.

काँग्रेससह राहुल गांधींवरही निशाणा साधला आणि यांचा लवकरच संपूर्ण देशातून सफाया होईल. शाह यांनी आसाममधील दिब्रुगड येथील भाजप प्रदेश कार्यालयाची पायाभरणीही केली. मी काँग्रेसला सांगू इच्छितो की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आसाममध्ये 14 पैकी 12 जागांवर विजय मिळवेल आणि मोदी 300 हून अधिक जागांसह पूर्ण बहुमत मिळवत तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. शाह यांनी मे, 2021 मध्ये हिमंता बिस्वा सरमा मुख्यमंत्री झाल्यानंतर, भाजपच्या नेतृत्वाखालील आसाम सरकारने केलेल्या कामांवर तसेच सुरू करण्यात आलेल्या योजनांवर प्रकाश टाकला. मी 2016 मध्ये इशान्येत भाजपची विजय यात्रा सुरू केल्याबद्दल आसामच्या जनतेचे आभार मानतो. आता राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि सहकारी या भागातील सर्वच राज्यांमध्ये सत्तेवर आहेत. तर गेल्या  काही वर्षांपूर्वी काँग्रेस हा इशान्येतील सर्वात मोठा पक्ष होता जो आता पूर्णपणे साफ झाला आहे. राहुल गांधींच्या आईनेही पंतप्रधान मोदींना शिव्या दिल्या, पण काहीही झाले नाही. काँग्रेसचे लोक पंतप्रधानांची कबर खोदण्याचे वक्तव्य करतात. पण, देशातील प्रत्येक नागरिक पंतप्रधान मोदींना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतो. विरोधक मोदींबद्दल जितके वाईट बोलत राहतील, तितकी भाजप वाढेल, असेही अमित शाह म्हणाले.

(हेही वाचा अदानींनी जाहीर केला मागील चार वर्षांचा जमाखर्च; राहुल गांधींच्या टीकेला चोख उत्तर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.