बंडखोरांवर Amit Shah यांचं विशेष लक्ष; महायुतीच्या नेत्यांना दिल्या महत्त्वाच्या सूचना

52
बंडखोरांवर Amit Shah यांचं विशेष लक्ष; महायुतीच्या नेत्यांना दिल्या महत्त्वाच्या सूचना
बंडखोरांवर Amit Shah यांचं विशेष लक्ष; महायुतीच्या नेत्यांना दिल्या महत्त्वाच्या सूचना

राज्यात विधानसभा निवडणुकीचे (Assembly Elections 2024) बिगुल वाजले असून, येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, महायुतीच्या तीनही घटक पक्षांकडून आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र अजूनही अशा काही विधानसभेच्या जागा आहेत, त्यावर अद्यापही तोडगा निघाला नसल्याने तिथे महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही. अशा जागांसाठी केंद्रीयमंत्री अमित शाहांच्या दिल्ली येथील निवासस्थानी २४ ऑक्टोबर रोजी महायुतीची (Mahayuti) मोठी बैठक पार पडली. यावेळी अमित शाहांनी महायुतीमधील नेत्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. (Amit Shah)    

काही विधानसभा मतदारसंघावर महायुतीमधील एका पेक्षा अधिक उमेदवारांनी दावा केला आहे. आता हा तिढा दिल्ली दरबारीच सुटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अमित शाहांसोबत बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार अमित शाहांची नजर महायुतीच्या बंडखोरांवर आहे. महायुतीच्या कुठल्याही पक्षाचे बंडखोर उभे राहणार नाहीत, मतविभाजन टाळण्यासाठी भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकजुटीने निवडणुका लढवण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. याची काळजी घेण्याच्या सूचना केंद्रीयमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी दिल्या आहेत. 

(हेही वाचा – Ncp Sharad Pawar गटाची पहिली यादी जाहीर, बारामतीत काका विरुद्ध पुतण्या लढाई होणार)

विधानसभा निवडणुकीसाठी कमी कालावधी उरला असताना, महायुतीच्या घटक पक्षांनी भाजपाने ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने ३८ आणि शिवसेनेच्या ४५ उमेदवारांची नावे आपल्या पहिल्या यादीमध्ये जाहीर केली आहेत. तर उर्वरित जागांबाबत दिल्ली येथे निर्णय होणार आहे.  (Amit Shah)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.