मुंबई विद्यापीठाची Mumbai University सिनेट निवडणूक येत्या १० सप्टेंबरला जाहीर करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत मनसेचे युवा नेते अमित ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांच्यात चांगलाच राजकीय सामना रंगणार आहे. यासाठी राजकीय पक्ष आणि मुंबई विद्यार्थी संघटना तयारीला लागली आहे.
ठाकरे बंधू आमने-सामने
सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच अमित ठाकरे कामाला लागले असून मनसे विद्यार्थी सेनेच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांची त्यांनी तातडीने बैठकीचे सत्र सुरु केले आहे. नुकतीच अमित ठाकरे यांची बैठक पार पडली यामध्ये निवडणुकीच्या संदर्भात ते कशा प्रकारे रणनिती आखतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तर ठाकरेंची युवा सेनाही कामाला लागली आहे. त्यामुळे या निवडणुकीत दोन्ही बंधू आमने सामने येणार आहेत.
(हेही वाचा No Confidence Motion : विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावात मोदी सरकार पास)
१३ सप्टेंबरला निकाल
या निवडणुकीचा निकाल १३ सप्टेंबर रोजी लागणार आहे. १० जागांसाठी ही निवडणूक लढली जाणार आहे. ५ जागा खुल्या प्रवर्गासाठी तर ५ जागा राखीव प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. यात कोण बाजी मारणार याकडेच सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Join Our WhatsApp Community