खड्ड्यांवरून आता ठाकरे घराण्यातील नवी पिढी आमनेसामने!

मनसे नेते अमित ठाकरे यांनी खड्ड्यांच्या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले होते.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांचा चा विषय चांगलाच गाजत चालला आहे. त्यावर सत्ताधारी शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपा असो की मनसे यांनी बाह्या सरसावल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनीही हा विषय उचलला आहे. मागील आठवडाभर अमित ठाकरे हे मुंबई, कल्याण, ठाणे या भागात फिरून तेथील खड्ड्यांवरून सत्ताधारी शिवसेनेला लक्ष्य करत आहेत. त्यावर प्रथमच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिल्याने येत्या काळात ठाकरे घराण्यातील ही नवी पिढी खड्ड्यांच्या मुद्द्यावरून आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

अमित ठाकरेंनी सत्ताधारी सेनेवर केली टीका!

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या जोरदार घडामोडी होताना दिसत आहेत. राजकीय नेते आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच आता ठाकरे बंधुमध्ये वाद-विवाद होताना दिसत आहे. नुकतेच मनसे नेते अमित ठाकरे यांनी खड्ड्यांच्या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले होते. मनसे नेते अमित ठाकरे हे कल्याण-डोंबिवली दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी रस्त्यांच्या झालेल्या बिकट परिस्थितीवरुन ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. अमित ठाकरेंच्या या टीकेला आता आदित्य ठाकरे यांनी चांगलेच उत्तर दिले आहे.

(हेही वाचा : क्लीन अप मार्शलच्या नाड्या महापालिका आवळणार, घेणार ‘हा’ निर्णय)

मुंबईवर विश्वास ठेवा! – आदित्य ठाकरे 

आपल्या सगळ्यांना मुंबईवर विश्वास आहे, बीएमसीवर विश्वास आहे, तो कायम ठेवा. आपण जे काम करतो ते काही एका रात्रीत होणार नाही. ते काम आपल्याला कायम करावे लागते, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी अमित ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. अमित ठाकरे यांनी रस्त्यांची झालेली बिकट परिस्थिती पाहून सरकारवर निशाणा साधला. याशिवाय त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करतही सरकारवर संताप व्यक्त केला होता. याविषयी माध्यमांनी जेव्हा आदित्य ठाकरे यांना विचारले तेव्हा आदित्य ठाकरे यांनी त्याला उत्तर दिले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here