अमित ठाकरेंना कोरोनाची लागण! 

अमित ठाकरे यांना सुरुवातीला ताप आला होता.

74

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा मनसे नेते अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अमित ठाकरे यांना दोन-तीन दिवसांपासून सर्दी आणि ताप होता. त्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली. राज ठाकरेंच्या कुटुंबातील इतर कुणालाही कोरोनाची लक्षणे नाहीत.

लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल!

अमित ठाकरे यांना खबरदारी म्हणून तातडीने लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. घरातील इतर सदस्यांना संसर्ग होऊ नये म्हणून तातडीने हा निर्णय घेण्यात आल्याचे कळते. याआधी सुद्धा ऑक्टोबर 2020 मध्ये अमित ठाकरे यांची प्रकृती अचानक खालावली होती. त्यामुळे त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मागील आठवड्यात राज ठाकरे यांना सुद्धा लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल  करण्यात आले होते. राज ठाकरे यांना पाठीचा त्रास होत असल्यामुळे मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली होती, त्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

(हेही वाचा : एफडीएची धडक मोहीम! ‘या’ भागातून रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा जप्त! )

रश्मी, आदित्य ठाकरेंनाही कोरोनाची लागण!

दरम्यान ठाकरे कुटुंबात या आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा शिवसेना नेते आदित्य ठाकरे या दोघांनाही कोरोनाची लागण झाली. रश्मी ठाकरे ह्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आता राज ठाकरेंना मास्कचे महत्व पटणार! 

दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून तोंडाला मास्क लावत नाहीत. अगदी सार्वजनिक कार्यक्रमातही ते विनामास्क फिरतात. याविषयी त्यांना अनेकदा विचारणा केल्यावर मास्क लावण्याची आपल्याला गरज वाटत नाही, असे ते म्हणतात. मागील २ महिन्यांपूर्वी राज ठाकरे नाशिकमध्ये कार्यकर्त्यांना भेटायला गेले असता स्थानिक पदाधिकाऱ्यालाही मास्क काढायला सांगितला होता. अशा राजा ठाकरे यांच्या घरात कोरोनाने शिरकाव केल्यामुळे त्यांना आता तरी मास्कचे महत्व पटेल, अशी चर्चा सुरु झाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.