अमित ठाकरेंचा ५ जुलैपासून कोकण दौरा! मनसेचे नियोजन सुरू 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे येत्या ५ जुलैपासून कोकणाच्या दौऱ्यावर येणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी १५ दिवसांत मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांमध्ये हजारो विद्यार्थ्याशी संवाद साधला. त्यानंतर नवीन नेमणुका जाहीर केल्या. अमित ठाकरे आता कोकणात येणार आहेत. येत्या ५ ते ११ जुलै या काळात ते कोकण दौरा करणार आहेत. या दौऱ्यात सिंधुदुर्गात दोन दिवस (५ आणि ६), रत्नागिरीत दोन दिवस (७ आणि ८) तर रायगडमध्ये तीन दिवस (९ ते ११ जुलै) त्यांचा दौरा असेल. तालुका तसेच गाव पातळीवरील स्थानिक मनसे पदाधिकारी, मनविसे पदाधिकारी आणि महाविद्यालयीन तरुण-तरुणी यांच्याशी ते संवाद साधणार आहेत.

( हेही वाचा : यंदा अकरावी प्रवेशासाठी ४९ हजार जागा वाढल्या!)

मनसेचे नियोजन सुरू 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांना कोकणात दौरा करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे अमित ठाकरे यांनी या दौऱ्याची जय्यत तयारी केली असल्याचे सांगितले जात आहे. अमित ठाकरे आपल्या जिल्ह्यात येणार म्हणून कोकणातील मनसे कार्यकर्त्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी अमित ठाकरे यांनी भेटू शकतील आणि त्यांच्याशी संवाद साधू शकतील अशाप्रकारचे नियोजन मनसेकडून करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here