Amit Thackeray : ना भांडुप, ना वरळी; अमित ठाकरेंसाठी माहीमच सरस

125
Amit Thackeray : ना भांडुप, ना वरळी; अमित ठाकरेंसाठी माहीमच सरस
  • सचिन धानजी, मुंबई

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) हे कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार यबाबत प्रसारमाध्यमातूनच तर्क वितर्क लढवले जात आहे. कधी भांडुप, तर कधी वरळी तर कधी माहीम विधानसभेतून अमित ठाकरे हे निवडणूक लढवतील असे बोलले जात आहे. परंतु अमित ठाकरे यांच्यासाठी मतदारसंघाची चाचपणी सुरु असली तरी ना भांडुप मतदारसंघ त्यांच्यासाठी चांगला आहे, ना वरळी विधानसभा. अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्यासाठी माहीम-दादर विधानसभा क्षेत्रच योग्य असल्याचे दिसून येत आहे.

भांडुप, वरळी आणि माहीम या तिन्ही विधानसभा क्षेत्रात मनसेने पाठिंबा दिलेल्या महायुतीच्या उमेदवाराला फक्त माहीम विधानसभेतच तब्बल १३,९०० मताधिक्य होते. त्यामुळे अमित ठाकरे यांच्यासाठी माहीम यांच्यासाठी निवडणूक लढण्यास अत्यंत सुरक्षित असून आदित्य ठाकरेंना निवडून आणण्यासाठी ज्याप्रकारे मनसेने समोर उमेदवार दिला नव्हता, त्याची परतफेड उबाठा शिवसेना अमित ठाकरेंसमोर उमेदवार न देता करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी सन २०१९ मध्ये प्रथम निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर वरळी विधानसभेची निवड केली आणि मनसेने या मतदारसंघात उमेदवार न देता ठाकरे कुटुंबातील पहिला आमदार निवडून आणण्यास मदत केली होती.

(हेही वाचा – २०१७ च्या सीएम फेलोशिपचा लाभार्थी बनला आयएएस अधिकारी; उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis म्हणाले, हा तरुण….)

परंतु आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याची तयारी सुरु झाली आहे. भांडुप विधानसभेत त्यांचे बॅनर झळकले गेले. त्यामुळे अमित ठाकरे हे भांडुपमधून निवडणूक लढवतील असे तर्क लढवले जात असतानाच अमित ठाकरे हे वरळीतील निवडणूक लढतील असे प्रसारमाध्यातून समोर येवू लागले. त्यामुळे तसे झाल्यास भाऊ विरुद्ध भाऊ आणि ठाकरे विरुद्ध ठाकरे असे चित्र पहायला मिळेल असे बोलले जात होते, परंतु आता अमित ठाकरे हे माहिम विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवणार असल्याचे वृत्त प्रसारीत होऊ लागले आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी माहीममधून निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला आहे. सध्या माहीमध्ये आपला माणूस या नावाने माजी आमदार नितीन सरदेसाई यांचे बॅनर झळकले असून पाच वर्षांत कुठल्याही मंडळांच्या कार्यक्रमाला भेटी न देणारे नितीन सरदेसाई हे यंदाच्या गणेशोत्सवात आणि नवरात्रोत्सवात मंडळांना भेटी देत बाप्पांचे आणि देवीचे दर्शन घेताना दिसले.

माहीम विधानसभेत मनसेकडून नितीन सरदेसाई यांच्या नावाची चर्चा असली तरी शिवडीप्रमाणे मनसेने माहीमसाठी सरदेसाई यांच्या नावाची घोषणा केली नव्हती. त्यामुळे माहीममधून अमित ठाकरे यांचे नाव पुढे येऊ शकते किंवा त्यांच्या नावाची चर्चा होऊ शकते, अशी शक्यता होती. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत या माहीम विधानसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांना ६९,४८८ एवढे मतदान झाले तर महाविकास आघाडीचे अनिल देसाई यांना ५५,४९८ एवढी मते मिळाली होती. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीचे प्राबल्य असून मनसेच्या पाठबळावर शेवाळेंना सुमारे १४ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे माहीम हा मतदारसंघ अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्यासाठी सर्वांत सुरक्षित मानला जात असून जर या मतदारसंघातून शिवसेनेने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्यास विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना विधान परिषदेवर पाठवणे किंवा महामंडळावर वर्णी लावली जाईल, असेही बोलले जात आहे.

(हेही वाचा – भाजपाच्या फायरब्रँड नेत्या Navneet Rana ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता )

वरळी विधानसभेत आदित्य ठाकरे यांना टक्कर देण्यासाठी या मतदारसंघाची जबाबदारी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर सोपवली असून त्यांनी संपूर्ण वरळीचा परिसर पिंजून काढून बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वरळीत अमित ठाकरेंच्या (Amit Thackeray) नावाची चर्चा सुरु होण्यामागे संदीप देशपांडे यांनी केलेली बांधणी. तसेच देशपांडे हे मनसे आणि राज ठाकरे यांच्यासाठी प्रामाणिक असल्याने अमित ठाकरे यांना वरळीतून निवडून आणण्यासाठी ते जिवाचे रान करू शकतात असे असा विश्वास मनसेला आहे. परंतु लोकसभेत वरळीतून महायुतीला अधिक मताधिक्य घेता आलेले नाही. तसेच भांडुप विधानसभा क्षेत्रात लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार कोटेचा यांना कमी मते मिळाली असली तरी आघाडीचे उमेदवार संजय पाटील यांना केवळ ४ हजारांचे मताधिक्य घेता आलेले आहे. त्यामुळे माहीम विधानसभा क्षेत्रातच अमित ठाकरे हे निवडून येवू शकतात असे आकडेवारीसह दिसून येत असून स्थानिकांचेही तेच म्हणणे आहे.

(हेही वाचा – Congress पळपुटी; ट्विट डिलीट करत काढला पळ)

लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवाराला मिळालेले मताधिक्य तथा पिछाडी

माहिम विधानसभा : महायुतीला आघाडी १३ हजार ९००

वरळी विधानसभा : महायुती पिछाडी सुमारे ६ हजार

भांडुप विधानसभा : महायुती पिछाडी, सुमारे ४ हजार

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.