MNS News : अनंत चतुर्दशीनंतर समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी अमित ठाकरेंची विशेष मोहीम!

103

अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबई आणि कोकणातील हजारो सार्वजनिक मंडळ तसंच गणेशभक्त मोठ्या भक्तिभावाने समुद्रात गणेश मूर्तीचे विसर्जन करतात, मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांपैकी अनेक मूर्त्या आणि मूर्तींचे अवशेष भरतीच्या लाटांसोबत समुद्र किनाऱ्यावर येऊन वाळूत रुततात. आपल्या लाडक्या गणरायाच्या मूर्तीचे भग्नावशेष पाहून सर्वजण हळहळ व्यक्त करतात. यामुळेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे अनंत चतुर्दशीच्या पुढच्या दिवशी म्हणजेच शनिवार १० सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते १० या दोन तासांत ‘आपले समुद्र किनारे आपली जबाबदारी’ ही मोहीम राबवणार आहेत.

( हेही वाचा : अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने ३ हजार ५०१ कोटींची मदत )

मुंबई कोकणात समुद्र स्वच्छता मोहीम

मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण १३ समुद्र किनाऱ्यांवर ही मोहीम राबवण्यात येणार असून त्यात मनसेचे शेकडो कार्यकर्ते तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

निर्माल्य महापालिकेला सोपवणार

मुंबईमध्ये गिरगांव, दादर, माहिम, वांद्रे, जुहू, वर्सोवा, अक्सा या समुद्र किनाऱ्यांवर, रायगड जिल्ह्यात उरण, वर्सोली, नागाव, अलिबाग, मुरुड या समुद्र किनाऱ्यांवर तर रत्नागिरीत मांडवी येथे महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेना समुद्र किनारा स्वच्छता मोहीम राबविणार आहे. स्वतः अमित ठाकरे दादर समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभागी होणार आहेत. मनसेचे पदाधिकारी समुद्र किनाऱ्यांवर वाळूत रुतलेल्या गणेश मूर्तींचे अवशेष तसेच निर्माल्य गोळा करून ते महापालिका प्रशासनाकडे सोपवणार आहेत. गेल्या वर्षी ११ डिसेंबर २०२१ रोजी अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कोकण किनारपट्टीवरील ४० समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.