माहीम विधानसभा मतदान संघातून मनसेच्या वतीने अमित राज ठाकरे निवडणूक रिंगणात उतरल्यानंतर सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. याच दिवशी उबाठा शिवसेनेचे उमेदवार महेश सावंत हे सुद्धा आपल्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यात करणार आहेत. मात्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना उमेदवारी मिळाल्यानंतर या मतदारसंघातून शिवसेना आणि उबाठा शिवसेना यांचे उमेदवार आपले अर्ज मागे घेतील असे बोलले जात होते. परंतु मागील काही दिवसात अमित ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीमधून थेट उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष टीका केल्याने या पक्षातील नेते प्रचंड नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांनी मात्र कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये अशा पद्धतीचा पावित्रा घेतला आहे त्यामुळे अमित ठाकरे यांची ही विधाने आता त्यांनाच अडचणीत आणणार की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मनसेचे माहीम मध्ये उमेदवार अमित ठाकरे यांनी अनेक प्रसार माध्यमात असेच दुरचित्रवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये उबाठा शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. याशिवाय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावरही अप्रत्यक्ष तोंडसुख घ्यायला ते मागे राहिले नाही. त्यामुळे कुठेतरी शिवसेना उबाठा पक्षाच्या भावना दुखवल्या गेल्याने, शिवसेना नेत्यांनी मात्र कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी मागे घेतली जावू नये अशा प्रकारची भूमिका उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडली असल्याची माहिती मिळत आहे. तर शिवसेनेचे काही नेते हे मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्यास घेतली जावी या भूमिकेचेच होते. परंतु अमित ठाकरे (Amit Thackeray) यांची विधाने पक्षाची आणि पक्षप्रमुखांची भावना दुखावणारी असल्याने या पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत जी भूमिका होती, त्यात बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते. उबाठा शिवसेना पक्षाच्या वरिष्ठ नेत्याच्या म्हणण्यानुसार, या मतदारसंघात आमच्या पक्षाच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार होतो. ठाकरे कुटुंबातील अमित असल्याने त्यांच्यासमोर कोणतेही आव्हान नको, अशा प्रकारची भूमिका पक्षातील नेत्यांनी घेतली होती. परंतु आता या भूमिकेत काही बदल झाल्याचे बघायला मिळत आहे. मात्र,तसे झाल्यास ठाकरे यांच्याकडून अमित ठाकरे विरोधात उमेदवारी अर्ज मागे घेतला जाणार नाही आणि याठिकाणी अमित ठाकरे यांना सदा सरवणकर आणि महेश सावंत यांचा सामना करावा लागणार असल्याची चिन्हे दिसून येत आहे. दरम्यान, महेश सावंत यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला गेल्यास सदा सरवणकर हेही अर्ज मागे घेतील अशीही शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सोमवारी सदा सरवणकर (Sada Sarvankar) आणि महेश सावंत (Mahesh Sawant) हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करत असले तरी ते खरोखरच लढणार आहेत की निवडणुकीची ओपीचारिकता पार पाडत आहे हे येत्या ४ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईल. (Amit Thackeray)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community