Bharat : ‘भारत माता कि जय’; देशाचे नाव बदलण्यास अमिताभ बच्चन यांचे अप्रत्यक्ष समर्थन 

बॉलिवूडचा महानायक बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी याला पाठिंबा देणारे सूचक ट्विट केले.

150

भारताच्या राष्ट्रपती यांनी G20 बैठकीला उपस्थित राहणाऱ्या २६ देशांच्या प्रमुखांना निमंत्रण पाठवले, त्यामध्ये President of india ऐवजी President of Bharat असा उल्लेख केल्यामुळे देशात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. कुणी यावर विरोधी मत मांडत आहे, तर कुणी पाठिंबा देत आहे. अशातच बॉलिवूडचा महानायक बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी याला पाठिंबा देणारे सूचक ट्विट केले आहे, जे सध्या सोशल मीडियात जोरदार चर्चेत आले आहे.

अमिताभ बच्चन यांनी केवळ एका ओळीचे ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी ‘भारत मात की जय’ असे लिहिले आहे. मंगळवारी, ५ सप्टेंबर रोजी सकाळपासून इंडिया आणि भारत यावर देशभर चर्चा सुरु झाली असताना अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून देशाला भारत संबोधित करण्यावर सकारात्मकता दर्शवणारे ट्विट करून एकप्रकारे मतप्रदर्शन केले आहे.

राजधानी दिल्लीत G20 परिषदेची तयारी सुरू आहे. यासाठी डिनरच्या निमंत्रण पत्रिकेवर President Of India ऐवजी President Of Bharat असे लिहिलेले आहे. त्यामुळे देशाचे नाव इंडिया ऐवजी भारत करणार असल्याची शंका काँग्रेसला आली. त्यानंतर एकीकडे काँग्रेस आक्रमक झाली तर दुसरीकडे इंडियाचा उल्लेख भारत करावा, अशी संपूर्ण देशाची मागणी असल्याचे भाजप नेत्यांनी म्हटले. या सगळ्या प्रकरणादरम्यान अमिताभ बच्चन यांनीदेखील ‘भारत माता की जय’ असे सूचक ट्वीट केले.

(हेही वाचा World Cup 2023 : भारतीय संघाची घोषणा! ‘या’ खेळाडूंचा समावेश)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.