राज्याच्या राजकारणात कालपासून उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्या वक्तव्याची चर्चा सुरू आहे. अजित पवारांनी (Ajit Pawar) खासदार अमोल कोल्हेंविरोधात (Amol Kolhe) दंड थोपटले आणि अमोल कोल्हेंना (Amol Kolhe) निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटलांनी (Dilip Walse Patil) जीवाचं रान केलं, पण यावेळी पाडणार म्हणजे पाडणारच, असं ते म्हणाले. काल सोमवारी (२५ डिसेंबर) अजित पवारांनी (Ajit Pawar) ते वक्तव्य केलं त्यानंतर मंगळवारी (२६ डिसेंबर) सकाळीच ते अमोल कोल्हेंच्या (Amol Kolhe) मतदारसंघात पाहणी करण्यासाठी पोहोचले. त्यानंतर खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) शरद पवारांच्या भेटीला दाखल झाले. शरद पवारांच्या मोदी बागेतील कार्यालयात ही भेट झाली आहे. (Amol Kolhe meet Sharad Pawar)
(हेही वाचा – Indian Army: जम्मू-कश्मीरमध्ये लष्करावर हल्ल्यासाठी वापरलेली शस्त्रे चिनी बनावटीची, सुरक्षा दलाला सापडले पुरावे)
वेगवेगळ्या मागण्यांसाठी शेतकरी आक्रोश मोर्चा
या भेटीनंतर खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी या भेटीचं कारण देखील सांगितलं आहे. शेतकरी मोर्चा बुधवार (२७ डिसेंबर) पासून सुरू होत आहे. २७ ते ३० डिसेंबर यादरम्यान हा मोर्चा पार पडणार आहे. शिवनेरीच्या पायथ्यापासून या मोर्चाला सुरूवात होणार आहे. कांदा प्रश्न, पिक वीमा, दुधाचे दर, शेतकऱ्यांना कर्जमाफी याशिवाय इतर मागण्यासाठी शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबत शरद पवार (Sharad Pawar) यांचे मार्गदर्शन घेतलं, याबाबत चर्चा झाल्याचे अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) यावेळी सांगितलं आहे. त्याचबरोबर ३० तारखेला शरद पवारांची (Sharad Pawar) सभा पार पडणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. (Amol Kolhe meet Sharad Pawar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community