अमोल मिटकरी आणि नाडा नसलेली चड्डी

175

हर घर तिरंगा या अभियानावर अमोल मिटकरी यांनी अतिशय गलिच्छ टिका केली होती. काही लोक अमोल मिटकरींना ‘बाजारु’ देखील म्हणतात. असो. मिटकरींचा एकंदर स्वभाव पाहता त्यांना कशातलंच काही कळत नाही असं वाटतं. परंतु ते असा आव आणून विधान करतात, जणू की ते त्या विषयाचे तज्ज्ञ आहेत. ते पुष्कळ पैसे घेऊन सामान्य भाषणे देतात. त्यांना बर्‍याचदा ते इतिहासकार असल्याचा साक्षात्कार होतो. त्यांनी सांगितलेल्या इतिहासाचे संदर्भ त्यांना द्यावेसे वाटत नाही. त्यांना कळतं मुंगीएवढं आणि ते बोलतात हत्तीएवढं. अशाप्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व आहे.

( हेही वाचा : ओ नाना पटोले, दहशतवाद हा कोणाचा व्यवसाय आहे?)

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे २ नेते गंभीर गुन्ह्यात तुरुंगात गेले आहेत. तरी मिटकरींना हे तिन्ही नेते स्वातंत्र्यसैनिक वाटतात. म्हणूनच त्यांनी असं विधान केलं आहे की, “मोहित कंबोज हा भाजपचा भोंगा आहे. हा भोंगा जनतेच्या प्रश्नावर, स्त्री अत्याचारावर, जीएसटी आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कधीही वाजत नाही.” आता आपले नेते गंभीर गुन्ह्यात अडकले आहे. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे समोर आले आहे. अनिल देशमुख १०० कोटी वसुलीसाठी तरुंगाची हवा खात आहेत. दुसरी गोष्ट संजय राऊत शिवसेनेचे नेते असले तरी तन-मन-धनाने ते राष्ट्रवादीचेच आहेत. ते शरद पवारांचे अतिशय खास आहेत. त्यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.

असं असताना या प्रश्नाला बगल देण्यासाठी त्यांना स्त्री किंवा इतर प्रश्नांची आठवण झालेली आहे. त्यांचं सरकार असताना यांनी किती स्त्रियांना त्रास दिला याचा विसर देखील त्यांना पडलेला आहे. नवनित राणा, केतकी चितळे, कंगना रानौत असा अनेक स्त्रियांचं नाव घेता येईल. संजय राऊत या स्त्रियांना गलिच्छ शिव्या देत होते, तेव्हा मिटकरींचं स्त्री-दाक्षिण्य कुठे चरायला गेलं होतं?

“मोहित कंबोज हा कोणाच्या चड्डीचा नाडा आहे, हे सगळ्यांना माहीत आहे” असंही इटकरी म्हणाले आहेत. संजय राऊत तुरुंगात असल्यामुळे लोकांचं मनोरंजन करण्याची जबाबदारी अमोल मिटकरी यांच्यावर येऊन पडलेली आहे असे दिसते. शरद पवार हे बडबड करणार्‍या लोकांना इतकं जवळ का करतात हे एक कोडं आहे. पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना राजकारणाची चांगलीच जाणीव आहे. परंतु सध्याचं त्यांचं गावणं त्यांच्या ज्येष्ठ व्यक्तिमत्वाला न शोभणारं असं आहे.

आधी नवाब मलिक, संजय राऊत आणि आता मिटकरी… काहीही माहिती नसताना मीडियासमोर येण्याची यांना फारच हौस. आता मोहित कंबोज हे कोणाच्या चड्डीचा नाडा आहे अशाप्रकारचं विधान त्यांना करावसं वाटलं. परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची गंभीर प्रकरणे पाहता अमोल मिटकरी यांना कदाचित याचाही विसर पडलेला आहे की त्यांनी नाडा नसलेली चड्डी घातलेली आहे. आता चड्डीला नाडा नसेल तर काय होईल, हे वेगळं सांगायचं हवं का?

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.