जयंतरावांनी बालमित्र मंडळाचा करेक्ट कार्यक्रम केला; Amol Mitkari यांनी मारले एकाच दगडात दोन पक्षी!

पाटलांच्या भूमिकेवर पवारांना विश्वास नाही ?

196
'जयंतरावांनी बालमित्र मंडळाचा करेक्ट कार्यक्रम केला'; Amol Mitkari यांनी मारले एकाच दगडात दोन पक्षी!
  • प्रतिनिधी

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाने महाविकास आघाडीत ८६ जागा लढविल्या होत्या, त्यातील फक्त १० जागा निवडून आल्या. यातच आता शरद पवार गटाने मुख्य प्रतोद म्हणून पहिल्यांदाच निवडून आलेल्या रोहित पाटील यांची नेमणूक केली आहे. तर विधिमंडळ पक्षाचे गटनेते म्हणून जितेंद्र आव्हाड आणि प्रतोद म्हणून आमदार उत्तम जानकर यांची निवड केली आहे. यावरून आता अजित पवार गटातील अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी शरद पवार गटातील नेत्यांना डिवचले आहे.

शरद पवार गटात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही विजयी झाले आहेत. परंतु शरद पवार गटाने रोहित पाटील, जानकर आणि आव्हाड यांच्यावर पक्षाने जबाबदारी टाकली आहे. यावरून अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

(हेही वाचा – Rohit Sharma : रोहितच्या नवीन बाळाचं नाव आलं समोर, रितिकाने केली इन्स्टाग्राम पोस्ट)

अमोल मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले की, “तुतारी गटाच्या मुख्य प्रतोदपदी नवखे तरुण आमदार रोहित आर. आर. आबांवर जबाबदारी देऊन जयंत पाटील साहेबांनी बालमित्र मंडळाचा करेक्ट कार्यक्रम केलाय. शिवाय या नावाच्या वैश्विक ज्ञान पाजळणाऱ्या बालिशला योग्य जागाही दाखवली आहे.” असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.

कमी वयात मोठी जबाबदारी आमदार रोहित पाटील यांच्यावर पक्षाने सोपवली आहे. आमदार उत्तम जानकर यांना देखील प्रतोदपदी कार्यभार देण्यात आला आहे. रविवारी पक्षाची बैठक झाली. यावेळी ९ सदस्य उपस्थित होते, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर बैठकीला उपस्थित नव्हते. विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने १० जागा जिंकल्या आहेत. त्यात, तासगाव मतदारसंघातून रोहित पाटील तर माळशिरस मतदारसंघातून उत्तम जानकर विधानसभेत पोहोचले आहेत.

(हेही वाचा – ICC Test Championship : दक्षिण आफ्रिकेच्या मोठ्या विजयामुळे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचं गणित पुन्हा बदललं, आफ्रिका दुसऱ्या स्थानावर)

जयंत पाटील यांची भूमिका संशयास्पद

अजित पवार यांच्या बंडापासून जयंत पाटीलही त्यांच्यासोबत जाणार अशा बातम्या समोर आल्या होत्या. जयंत पाटील यांनी अमित शहांची भेट घेतल्याचीही चर्चा होती. तसेच जयंत पाटील यांच्यासाठी महायुतीमध्ये एक मंत्रिपद ठेवलं आहे, असं अजित पवार म्हणाले होते. आता पुन्हा एकदा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

रोहित पवार यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी देताना त्यांच्या बाजूने उभी राहणाऱ्या नेत्यांची फळी तयार करण्याचीही पवारांची रणनिती असावी अशी शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे विधानसभेआधी राष्ट्रवादीमध्ये जयंत पाटील विरुद्ध रोहित पवार यांच्यामध्ये अंतर्गत संघर्ष रंगला होता. रोहित पाटील यांच्याकडे जबाबदारी देण्यावरुनच हा वाद झाल्याची चर्चा होती. अशात आता शरद पवारांनीच रोहित पाटील यांना ताकद दिल्याने जयंत पाटील यांच्याविरुद्ध खेळी आहे का ? असा सवाल उपस्थित होत आहे. (Amol Mitkari)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.