Amravati Airport : अमरावती विमानतळावर पहिल्या प्रवासी विमानाचं लॅन्डिंग ; १० तासांचा प्रवास आता २ तासांवर

Amravati Airport : अमरावती विमानतळावर पहिल्या प्रवासी विमानाचं लॅन्डिंग ; १० तासांचा प्रवास आता २ तासांवर

115

अमरावती विमानतळावर (Amravati Airport ) पहिल्या प्रवासी विमानाचं सुरक्षित लॅन्डिंग पार पडलं आहे. मुंबईवरून सकाळी साडेआठच्या सुमारास उड्डाण करणारं विमान सव्वाअकरा वाजता अमरावती विमानतळावर उतरलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितित अमरावती विमानतळाचे आणि प्रवासी विमान सेवेचे लोकार्पण झाले. पाठोपाठ एअर इंडिया एफटीओच्या डेमो फ्लाईटचे अमरावती विमानतळावरून देखील उड्डाण झाले. (Amravati Airport )

आमदार रवी राणा म्हणाले, “यवतमाळ, अकोला भागातले प्रवासीही अमरावती विमानतळाहून मुंबईला जातील. तसेच आगामी काळात स्टार एअरलाईन्स व इंडिगो देखील अमरावती सेवा सुरू करत आहेत. भविष्यात अमरावती ते दिल्ली आणि अमरावती ते पुणे अशा सेवा सुरू व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. अमरावती विमानतळाला भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचं नाव मिळावं अशी माझी इच्छा आहे.” (Amravati Airport )

आठवड्यातून तीन दिवस मुंबई-अमरावती-मुंबई अशी प्रवासी विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. या दोन प्रमुख शहरांमधील अंतर आता अवघ्या पावणे दोन तासांत पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे १० तास वाचतील. रस्त्याने याच प्रवासाला १२ ते १३ तास लागतात. (Amravati Airport )

अमरावती विमानतळाच्या धावपट्टीची लांबी १८५० मीटर असून रुंदी ४५ मीटर इतकी आहे. आशियातील सर्वात मोठं एअर इंडियाचं वैमानिक प्रशिक्षण केंद्र इथे उभारलं जाणार आहे. विमानतळावर एकाच वेळी एटीआर/७२ सीटर अशी दोन विमाने उभी केली (पार्क) जाऊ शकतात. ऑक्टोबर महिन्यात विमानतळावर नाईट लॅण्डिंग देखील सुरू होणार आहे. (Amravati Airport )

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.