आमदारांना घोडा म्हणणं, हा गाढवपणा! भाजपच्या अनिल बोडेंचा राऊतांवर हल्लाबोल

91

आमदारांना घोडा म्हणणं हा केवळ शुद्ध गाढवपणा आहे. ही चूक ज्यांनी केली, त्यांच्या ती लक्षात आली आहे. त्यामुळेच संजय राऊत यांनी देवेंद्र भुयार या प्रकरणी युटर्न घेतल्याचे वक्तव्य भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केले आहे. अपक्ष आमदार देवेंद्र भुयारांची मुख्यमंत्र्यांबाबत केलेली तक्रार योग्य असून त्यासंदर्भात उपाययोजना करू असे राऊत यांना सांगितले होते. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आमदारांनी दगाबाजी केल्याचा आरोप करताना आधी हे आमदार घोडे बाजारात विकले गेले, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. राऊतांच्या या यू-टर्नवर भाजप खासदार अनिल बोंडेंनी हल्लाबोल केला आहे.

(हेही वाचा – ‘घोडेबाजार’वरून सोमय्यांचा शिवसेनेवर निशाणा, म्हणाले, हे पाप गाढवच करू शकतात!)

काय म्हणाले अनिल बोंडे

देवेंद्र भुयार प्रकरणी संजय राऊतांची यू-टर्न घेतल्यावर अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया दिली. अपक्ष आमदार तीन लाख लोकांचे प्रातिनिधित्व करतो. त्याला घोडो म्हणणं हा गाढवपणा आहे आणि राऊतांना हे कळून चुकलं आहे. त्यामुळे त्यांनी आता युटर्न घेतला आहे. कारण प्रत्येक आमदाराला विचारणारे लोक मतदार संघात असतात. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मला निधी मिळायचा कामे होत होती. रूग्णांना, शेतकऱ्यांना मदत केली. पण महाविकास आघाडी सरकारला प्रत्येकजण त्रासलेला आहे. मुख्यमंत्री जर तुम्हाला भेटणार नसेल तुम्हाला मदत करणार नसेल तर आमदारांची देखील कुचंबणा होते, असे अनिल बोंडेंनी म्हटले.

राऊतांनी घेतला यु-टर्न

राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. संजय राऊतांनी दगाबाजांविरोधात अरेरावीची भाषा वापरली. या निवडणुकीत ज्यांनी दगा दिला त्यांना बघून घेतलं जाईल. जे घोडे बाजारात विक्रीसाठी होते, ते विकले गेले, असे राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी मोर्शीचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांचेही नाव घेतले होते. मात्र भुयार यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. मुख्यमंत्री आम्हाला मदत करत नाही. त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटही होत नाही, असे असले तरी मी मविआलाच मतदान केले आहे. पण राऊतांनी असे आरोप करणे चुकीचे आहे. अशी खंत यावेळी भुयारी यांनी व्यक्त केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.