राजस्थानातील उदयपूर येथे नुपूर शर्माचे समर्थन केल्यामुळे एका दुकानदाराची धर्मांध मुसलमानांनी गळा चिरून हत्या केली. त्यानंतर लागलीच महाराष्ट्रातही अमरावती येथेही नुपूर शर्माचे समर्थन केल्याप्रकरणी आणखी एका दुकानदारांची भोसकून हत्या करण्यात आली. हे प्रकरण इतक्यावरच न थांबता आता राज्यात अनेकांना जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत. त्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला आहे.
अशा प्रकारे नुपूर शर्माचे समर्थन केल्यामुळे ७ जणांना धमक्या देण्यात आल्या आहेत, असे वृत्त काही माध्यमे देत आहेत. यातील एक डॉ. गोपाल राठी हे आहेत. डॉ. राठी यांनी नुपूर शर्मा यांच्याविषयी ‘आय सपोर्ट नुपूर शर्मा’, असे व्हॉट्सऍप स्टेटस ठेवले होते. त्यानंतर त्यांना धमकीचे संदेश येण्यास सुरूवात झाली. त्यामध्ये डॉ. झिशान, डॉ. सोहेल कादरी यांचा धमकीचे संदेश पाठवाऱ्यांमध्ये सहभाग आहे. त्यानंतर डॉ. गोपाल राठी यांनी व्हिडीओद्वारे जाहीर माफी देखील मागितली आहे.
(हेही वाचा BJP National Executive Meeting : भाजपाला सर्व समाजघटकांपर्यंत पोहचवा! पंतप्रधानांचे कार्यकर्त्यांना आवाहन )
काय आहे उमेश कोल्हे हत्या प्रकरण?
नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्यामुळे उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यावेळी 16 जून रोजी घटनेचा मास्टर माईंड इरफान शेख याने सगळ्या शूटरसोबत बैठक घेतली होती आणि याच बैठकीत उमेश कोल्हे यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. या हत्येमध्ये एकून सात व्यक्ती सहभागी होते. ज्यामध्ये युसूफ हा उमेशचा खूप जवळचा मित्र होता आणि तो उमेशच्या अंत्यसंस्कारात देखील सहभागी झाला होता. उमेश कोल्हे यांच्यावर आरोपींनी ज्याप्रकारे हल्ला केला, त्यात उमेशच्या मेंदूच्या नसा, श्वासोच्छवासाची नळी, अन्नाची नळी, डोळ्याची रक्तवाहिनी चाकूने हल्ला केल्यामुळे फाटल्या होत्या.
Join Our WhatsApp Communityअमरावती हत्याकांड में बड़ा खुलासा।
उमेश की हत्या में शामिल था करीबी दोस्त डॉ मोहम्मद यूसुफ खान।
किसी को शक न हो इसलिए मोहम्मद यूसुफ खान उमेश के अंतिम संस्कार में हुआ था शामिल।
— Panchjanya (@epanchjanya) July 3, 2022