राजद्रोहाच्या खटल्याअंतर्गत जामीन मंजूर झाल्यानंतर आमरावतीच्या खासदार नवनीत राणा उपचारासाठी मुंबईत लिलावती रूग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यानंतर तीन दिवसांनी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर राणा दाम्पत्य दिल्लीकडे रवाना झाल्याने सांगितले जात आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि दिल्लीला जाण्याचे कारण राणा यांनी पुन्हा स्पष्ट केले.
काय म्हणाले राणा?
ठाकरे सरकारने अन्याय केला असून लोकप्रतिनिधीला चुकीची वागणूक दिल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात तक्रार करणार असल्याचे नवनीत राणांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. आमदार आणि खासदार तसेच भारतीय नागरिक म्हणून आम्ही कायम न्यायायलाचा आदर करत आलो आहोत आणि पुढे देखील करणार असून त्यांच्या आदेशाचं पालन करणार आहे. त्यामुळे आतापर्यंत आम्ही जे काही केलं त्यामुळे आम्ही न्यायालयाचा अवमान केला आहे, असे वाटत नाही असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच राणा दाम्पत्य दिल्लीकडे रवाना झाले असून गृहमंत्री अमित शाह आणि लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
(हेही वाचा – Loudspeaker row: ‘या’ राज्यातील १ हजार मंदिरात पहाटे वाजणार हनुमान चालीसा!)
… म्हणून राणा दाम्पत्य दिल्लीकडे रवाना
सोमवारी राणा दाम्पत्य मुंबई पोलीस व संजय राऊत यांची तक्रार दिल्लीत करण्यासाठी रवाना झाले आहेत. देशाचे गृहमंत्री महिलांचा सन्मान करणारे आहेत. ते आमची तक्रार ऐकून घेतील असा विश्वास आम्हाला आहे. राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या दडपशाहीची तक्रार आम्ही करणार आहोत. अजित पवार हेच मुख्यमंत्र्यांपेक्षा अधिक काम करत आहेत. त्यामुळे त्यांनी पोलीस ठाण्यातील व्हिडिओ संदर्भात बोलणे पटलेले नाही. त्यामुळे त्यांनी संपूर्ण प्रकरणाची नीट माहिती घ्यावी. सांताक्रूझ पोलीस ठाण्यातील रात्री साडेबारानंतरचे फुटेज अजित पवार यांनी तपासावे आणि सत्य परिस्थिती लोकांसमोर आणावी असे आमचं आवाहन असल्याचे आमदार रवी राणा माध्यमांशी बोलताना सांगितले.
फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंनी शिकले पाहिजे
दरम्यान, दिल्लीला रवाना होण्यापूर्वी नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे. नवनीत राणा उद्धव ठाकरेना सल्ला देताना म्हणाल्यात, तत्त्व काय असतात हे उद्धव ठाकरेंनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही. ज्यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांच्याकडे कोणतीही तत्त्व नाहीत. लोकप्रतिनिधींना आणि महिलेला कशी वागणूक द्यायची, हे त्यांनी आधी शिकावे. उद्धव ठाकरे ज्या प्रमाणे सूड बुद्धीने राजकारण करत आहेत, त्याविरोधात नवनीत राणांनी टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनीही पाच वर्षे सरकार चालवलंय अशा प्रकारे सुडाचे राजकारण त्यांनी कधीही केलेले नाही. त्यांच्याकडून उद्धव ठाकरेंनी शिकले पाहिजे, असे वक्तव्य नवनीत राणा यांनी केले.
Join Our WhatsApp Community